D.Raja sakal
देश

राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा उमेदवार

‘भाकप’चे नेते डी. राजा यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

पाटणा : राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून एक उमेदवार उभा केला जाईल, अशी माहिती भारताय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी दिली.‘भाकप’च्या दोन दिवसांच्या बिहार राज्य परिषदेची सांगता मंगळवारी (ता.१९) झाली. त्यानंतर डी. राजा म्हणाले, ‘‘राज्यांमधील निवडणुका विरोधी पक्षांनी स्वतंत्रपणे लढल्या असल्या तरी राज्यघटना व लोकशाहीच्या बचावासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत राष्ट्रपती निवडणूक एकजुटीने लढवेल. याची सुरुवात झाली आहे.

’’ काही दिवसांपूर्वीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट झाली होती. त्यात राजद नेते तेजस्वी यादव यांचाही समावेश होता. ‘राष्ट्रपती निवडणुकीतील विरोधी पक्षांच्या एकीसाठी भाकप पुढाकार घेईल, असे डी. राजा म्हणाले. ‘‘राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची ताकद पाहायला मिळेल. या निवडणुकीसाठी देशभरातील सर्व डावे पक्ष आणि विरोधक ताकदीने एकत्र आले आहेत,’’ असे राष्ट्रीय चिटणीस अतुल कुमार अनजान यांनी सांगितले.

सप्टेंबर राज्य संमेलन

दोन दिवसांच्य राज्य परिषदेत पक्षाने संघटनेची मजबूतीस आंदोलन अशा वेगवेगळ्या मुद्यांवर विस्ताराने चर्चा केली. बिहारमधील बांका जिल्ह्यात राज्य संमेलन यंदा १८ ते २१ सप्टेंबरमध्ये आयोजित करण्याचा निर्णयही यावेळी झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT