opposition parties slam bjp over BJP modi govt Cabinet Portfolio Announcement marathi news  
देश

मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपकडून घटकपक्षांना दुय्यम वागणूक? मंत्र्यांच्या खातेवाटपावर विरोधकांची टीका

PM Modi Cabinet Formation 2024 : महत्त्वाच्या खात्यांपैकी नागरी उड्डयन मंत्रालय टीडीपीचे के. आर. नायडू व जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी यांच्याकडे अवजड उद्योग ही मंत्रालयच घटकपक्षांच्या ताब्यात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) घटकपक्षांना मिळालेल्या खातेवाटपावर विरोधकांनी टीका केली असून घटक पक्षांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

गेल्या रविवारी मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर सोमवारी रात्री मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आहेत. यात महत्त्वाची सर्व खाती भाजपने आपल्याकडे राखल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थ, परराष्ट्र व्यवहार, संरक्षण व गृह या चार महत्त्वाच्या खात्यांशिवाय महत्वाचे कृषी, भूपृष्ठ वाहतूक, जलशक्ती, शिक्षण, वाणिज्य, आदिवासी विकास,रेल्वे, दूरसंचार, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, कोळसा व खाण ही सर्व मंत्रालये भाजपने आपल्याकडे राखले आहे.

महत्त्वाच्या खात्यांपैकी नागरी उड्डयन मंत्रालय टीडीपीचे के. आर. नायडू व जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी यांच्याकडे अवजड उद्योग ही मंत्रालयच घटकपक्षांच्या ताब्यात आहेत. कॅबिनेट मंत्री असलेल्या जेडीयूचे लल्लन सिंग यांना पंचायती राज व लोजपचे चिराग पासवान यांच्याकडे कमी महत्त्वाची अन्न प्रक्रिया उद्योग खाते दिले आहे. या खातेवाटपावरून भाजपचा मंत्रिमंडळावर पूर्ण प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या संचार विभागाचे प्रमुख खासदार जयराम रमेश यांनी संसदीय कामकाज मंत्रिपद किरेन रिजीजू यांच्याकडे दिल्यावर टीका केली आहे. गेल्या दहा वर्षात ज्या प्रकारे लोकसभेचे कामकाज सुरू राहिले आहे. त्यात काही बदल व्हावा, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु ‘इंडिया’ आघाडीचे नेते लोकसभा व राज्यसभेत लोकांचे प्रश्न उठविण्याचे काम करणार आहे. माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सत्तेच्या वर्तुळात घटकपक्षांना चांगले स्थान मिळालेले नाही. भाजपने त्यांच्यासाठी चांगली खाते रिकामे ठेवली नसल्याचे म्हटले आहे.

आप, काँग्रेसकडून आरोप

‘आप’च्या नेत्या आतिशी यांनी घटकपक्षांना भाजपने दुय्यम दर्जाची वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. आघाडीमध्ये घटकपक्षांना सन्मान द्यायला हवा होता. काँग्रेसचे नेते कार्ति चिदंबरम यांनी ‘सेम ओल्ड, सेम ओल्ड’ असे म्हणत तरुणांना या मंत्रिमंडळातून डावलल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी नव्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपावरून भविष्यात खूप काही पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मंत्रिमंडळ वाटपावरून भाजपला केंद्रातील सरकार पाच वर्षे चालवायचे नसल्याचे स्पष्ट होत आहे, अशा शब्दांत टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BSNL latest News : 'बीएसएनएल' ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ; कंपनी लवकरच 'ही' सेवा बंद करणार!

Virat Kohli Santa Video : विराट कोहली नाताळादिवशी बनला सांताक्लॉज, मुलांना दिले भन्नाट गिफ्ट्स, व्हिडिओ व्हायरल

'धुरंधर'मधील २० वर्षीय अभिनेत्री आणि सचिन तेंडुलकर यांचा नेमका संबंध काय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Uruli Kanchan Crime : आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन २ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माऊंट मेरी चर्चमध्ये ख्रिसमसचा जल्लोष, प्रभू येशूच्या जन्मोत्सवासाठी वांद्र्यात गर्दी

SCROLL FOR NEXT