Narendra Modi Sakal
देश

म्युकरमायकोसिसची औषधे कोठूनही मागवा: पंतप्रधान

दुसऱ्या लाटेवेळी झालेल्या चुकांमधून धडा घेऊन, नव्या रोगाची औषधे कोणत्याही परिस्थितीत कमी पडू नयेत यादृष्टीने सरकारने युद्धपातळीवर हालचाली केल्या आहेत.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) (Mucormycosis) संसर्गाच्या (Infection) उपचारांसाठी (Treatment) लागणारे लिपोसोमल अँफोटेरेसिन-बी हे इंजेक्शन आणि इतर औषधांचा पुरवठा (Medicine Supply) पुरेशा प्रमाणात होण्यासाठी, जगात मिळेल तिथून ही औषधे युद्धस्तरावर रातोरात मागवावीत, असे स्पष्ट निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिले. (Order Mucormycosis Medications from Anywhere Narendra Modi)

दुसऱ्या लाटेवेळी झालेल्या चुकांमधून धडा घेऊन, नव्या रोगाची औषधे कोणत्याही परिस्थितीत कमी पडू नयेत यादृष्टीने सरकारने युद्धपातळीवर हालचाली केल्या आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातसह देशाच्या अनेक राज्यांत काळ्या बुरशीच्या रोगाने हातपाय पसरले आहेत. याची रुग्णसंख्या ११,७१७ हजारांचा आकडा ओलांडून गेली आहे. कोरोनापाठोपाठ आलेल्या या संसर्गाशी लढण्यासाठी अँफोटेरेसिन-बी इंजेक्शनचा व अन्य औषधांचा तुटवडा कोणत्याही स्थितीत जाणवता कामा नये, असे पंतप्रधानांनी बजावले आहे. केंद्राने आणखी पाच कंपन्यांना याच्या उत्पादनाचा आपत्कालीन परवाना मंजूर केला आहे. पंतप्रधानांनी दररोज यासंदर्भात अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय चर्चा सुरू ठेवली असून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मिळाले तरी हे औषध घेऊन यावे. प्रसंगी त्यासाठी आपण स्वतः जागतिक नेत्यांबरोबर बोलू, असे मोदी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

Pregnancy Job Scam : महिलांना गरोदर करा आणि कमवा 10 लाख! 'प्रेग्नंट जॉब सर्विस'च्या नावाखाली मोठा घोटाळा उघड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT