Mansukh mandviya
Mansukh mandviya sakal media
देश

ऑस्टोमी रुग्णांना अपंग दर्जा; खासदार गजानन कीर्तीकर यांची शिष्टाई

कृष्ण जोशी

मुंबई : ऑस्टोमी रुग्णांना (Ostomy patients) अपंग दर्जा (Handicapped Rank) देण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandviya) यांनी अनुकूलता दर्शविली असून या रुग्णांना तशी प्रमाणपत्रे (certificate) देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan kiritikar) यांनी याबाबत मंत्र्यांकडे शिष्टमंडळाद्वारे विनंती केली होती.

ऑस्टोमी असोसिएशन ऑफ इंडियाचे मानद सचिव शेखरभाई ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या मागणीस केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी त्वरित मान्यता दिली असून संबंधितांना तशी प्रमाणपत्रे देण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. जन्मतः अल्सर, कॅन्सरग्रस्त असलेल्यांपैकी काही रुग्णांचे तसेच काही अपघातग्रस्तांचे मोठे आतडे तसेच मूत्राशय काढून टाकण्यात येते. त्यांचे मलमूत्र जाण्यासाठी कृत्रिम मार्ग तयार करावा लागतो.

त्यामुळे अशा रुग्णांना त्याची पिशवी कायम पोटावर बाळगावी लागते, त्यामुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा येऊन हे रुग्ण एका अर्थाने अपंग होतात. त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे सहजपणे हवे तेथे फिरता येत नाही. मात्र अनेकदा मागणी होऊनही या रुग्णांना अपंगत्व दाखला मिळाला नाही. त्यामुळे असोसिएशनच्या शिष्टमंडळासह आज कीर्तीकर यांनी आरोग्यमंत्री मांडवीय यांची भेट घेतली. त्यांना यासंदर्भातील परिस्थिती सांगण्यात आली. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करण्यास तत्वतः मान्यता दिली. अन्य सर्व औपचारिक बाबी पूर्ण करून तसेच अन्य मुद्दे तपासून यासंदर्भातील आदेश लौकरच काढले जातील, असेही आश्वासन देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT