देश

....तरच कोरोनाची तिसरी लाट टाळता येईल!

नामदेव कुंभार

नवी दिल्ली : आपण सर्वांनीच कोरोना विषयक नियम आणि वर्तणुकीचे पालन केले, तसेच अधिकाधिक लोकांचे लसीकरण झाले तर तिसरी लाट टाळता येऊ शकेल, असं नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. असे अनेक देश आहेत, जिथे कोरोनाची दुसरी लाटही आली नाही. आपण नियमांचे पालन केले तर हा काळही निघून जाईल. अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करत सगळे व्यवहार पूर्ववत करण्यासाठी जलद लसीकरण आवश्यक आहे, असेही पॉल म्हणाले.

लस असुरक्षित आहे, असे समजणे ही सर्वात मोठी चूक आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना आधी लस देऊन सुरक्षित करण्याच्या निर्णयामुळे दुसऱ्या लाटेत त्यांना सुरक्षित ठेवू शकलो. खूप कमी आरोग्य कर्मचाऱ्यांना या काळात संसर्ग झाला. अन्यथा आरोग्य यंत्रणा आणि रुग्णालये दुसऱ्या लाटेत कोलमडली असती. त्यामुळे, याची खात्री बाळगा, की लसींमुळे लोकांचा संसर्गापासून बचाव होतो आहे, असे पॉल यांनी सांगितलं.

बाजारांतील गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी -

दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेला विषाणूचा डेल्टा व्हॅरियंट नष्ट झालेला नाही. त्यात बदल होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. लॅम्बडा नावाचा विषाणूचा नवा प्रकार परदेशात सापडला आहे. विषाणूतील बदल हा देखील तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरू शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी बाजारांतील गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरेल, असे मत मांडले आहे.

संसर्गाचा दर पाच टक्यांखाली

देशात कोरोनाचा दैनंदिन संसर्गाचा सरासरी दर पाच टक्क्यांपेक्षा खाली आहे. दुसऱ्या लाटेमुळे ठप्प झालेले जनजीवन पूर्ववत करण्यासाठी हे दिलासादायक चित्र असले, तरी विषाणूचे बदलत असलेले रुप हे तिसऱ्या लाटेचा धोका कायम ठेऊन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT