Gujrat Flood  
देश

Gujrat Flood: दक्षिण गुजरातमध्ये पुराचे थैमान, सव्वा दोन हजाराहून अधिक नागरिकांचे केले स्थलांतर

Gujrat Rain Update: नवसारी जिल्ह्यातून वाहत जाणाऱ्या तापी नदीने धोक्याची पातळ ओलांडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Navsari Latest Update: दक्षिण गुजरातमधील अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी शिरले असून येथील अडीच हजारहून अधिक जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती शुक्रवारी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

नवसारीमधील नदीकाठच्या गावातील दोन हजार २०० जणांना तर तापी जिल्ह्यातील ५०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. नवसारी जिल्ह्यातून वाहत जाणाऱ्या तापी नदीने धोक्याची पातळ ओलांडली आहे.

या नदीची धोक्याची पातळी २३ फुटांवर निश्‍चित करण्यात आली असून मागील २४ तासांत येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे सध्या नदीची पातळी २८ फुटांवर पोहोचली आहे, अशी माहिती नवसारीच्या जिल्हाधिकारी क्षिप्रा आग्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांसाठी १५ वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

येथील वलोद, सोनगड, व्यारा आणि डोलवण या तालुक्यांतील ११३ रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शुक्रवारी सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार डोलवण तालुक्यात मागील २४ तासांत १७३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या भागांत शनिवारी देखील मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT