देश

बायको म्हणे, नवऱ्यानं केलेली मारहाण योग्यच; संशोधनाचा निष्कर्ष

राष्ट्रीय सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर

सकाळ डिजिटल टीम

NFHS Survey : अठरा राज्य आणि केद्रशासित प्रदेशांमध्ये 14 ते 30 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांनी काही परिस्थितीमध्ये आपल्या नवऱ्याकडून होणाऱ्या मारहाणीचे समर्थन करत योग्य ठरवले आहे तर काही पुरुषांनी या वागणूकीला तर्कशुद्ध असल्याचे सांगितले आहे. ही बाब राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस)मध्ये समोर आली आहे.

एनएफएचएस5 नुसार, तेलंगना (84 टक्के), आंध्र प्रदेश (84 टक्के ) और कर्नाटक (77 टक्के) या तीन राज्यांमध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांनी पुरुषांद्वारा आपल्याला होणाऱ्या मारहाणीचे समर्थन केले आहे. तेच मणिपूर(66 टक्के), केरळमध्ये (52 टक्के), जम्मू कश्मीर(49 टक्के), महाराष्ट्र 44 टक्के आणि पश्चिम बंगाल (42 टक्के) असे अन्य राज्य आणि केंद्र शासित प्रदेश आहेत जिथे मोठ्या संख्येने महिलांनी पुरुषांद्वारा आपल्या पत्नीच्या मारहाणीचे समर्थन केले आहे.

''तुमच्या मते, नवऱ्यांनी आपल्या पत्नीला मारहाण करणे योग्य आहे की नाही?'' या एनएफएचएसद्वारा विचारले जाणाऱ्या प्रश्नावर 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांनी होय असे उत्तर दिले. सर्वेक्षणमध्ये ज्या स्थितीमध्ये नवरा आपल्या बायकोला मारहाण करतो अशा संभाव्य स्थिती समोर आल्या.

जर नवऱ्याला पत्नी विश्वासघातकी असल्याचा संशय आला, जर ती सासरच्या लोकांचा अनादर करत असेल, त्यांच्याशी भांडत असेल, त्याच्यासोबत शारीरीक संबध ठेवण्यास नकार देत असेल, त्याला न सांगता बाहेर गेली, जर मुलांकडे किंवा घराकडे दुर्लक्ष केले, चांगले जेवण नाही बनवले या कारणामुळे महिलांना मारहाण केली जाते. उत्तर देणाऱ्यांपैकी सर्वसाधारणपणे घराकडे किंवा मुलांकडे दुर्लक्ष करणे किंवा सासरच्या लोकांचा अनादर कारण सांगून मारहाण योग्य ठरविल्याचे समोर आले.

18 राज्यांमध्ये 13 हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, गुजरात, नागालँड, गोवा, बिहार, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र, तेलंगना, नागालँड आणि पश्चिम बंगालमधील उत्तर देणाऱ्या महिलांनी सासरच्या मंडळीचा अनादर हे कारण मारहाण करणे योग्य ठरविण्यासाठी सांगितले. नवऱ्याकडून होणारी मारहाण योग्या ठरविण्याऱ्या महिलांमध्ये सर्वात कमी संख्या हिमाचलप्रदेशमध्ये 14.8 टक्के होती.

पुरुषांमध्ये उत्तर देणाऱ्यांपैकी कर्नाटकच्या 81.9 टक्के आणि हिमाचल प्रदेशमध्ये 14.2 टक्के पुरषांनी अशी वागणूक योग्य असल्याचे सांगितले. हैद्राबादमधील एनजीओ रोशनी चे संचालक उषाश्री यांनी सांगितले की त्यांच्या गटाद्वारा कोरोना पॅडमिकच्या काळात लैगिंक शोषण आणि घरगुती हिंसाचारमध्ये वाढ झाल्याचे समोर आले. रोशनी भावनात्मक संकटांध्ये लोकांना सल्ला आणि इतर सेवा प्रदान करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT