P. C. Chako  sakal
देश

P. C. Chako : पी. सी. चाको कार्यकारी अध्यक्षपदी ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून घोषणा

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांच्यासोबतच केरळचे नेते पी. सी. चाको यांची नियुक्ती केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या नियुक्तीचे औपचारिक पत्र आज जारी केले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांच्यासोबतच केरळचे नेते पी. सी. चाको यांची नियुक्ती केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या नियुक्तीचे औपचारिक पत्र आज जारी केले. चाको यांच्यासोबतच राजीव झा यांचीही पक्षाच्या सरचिटणीसपदी नेमणूक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असताना सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल असे दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले होते. पक्ष फुटल्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक केली होती.

आता केरळमधील नेते चाको यांच्यावरही कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये चाको यांच्या नियुक्तीची माहिती दिली. पी. सी. चाको मार्च यांनी २०२१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यूपीए सरकारच्या कार्यकाळात केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार राहिलेल्या चाको यांनी स्पेक्ट्रम गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदावरून या गैरव्यवहाराची चौकशी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT