Farmers protest 
देश

हरयाणा सरकार शेतकऱ्यांसमोर झुकलं; भात, बाजरीची खरेदी प्रक्रिया उद्यापासून

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनासमोर अखेर हरियाना सरकारला झुकावे लागले असून उद्या रविवारपासून राज्यात भात आणि बाजरीची खरेदी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. आज हरियानातील कर्नाल जिल्ह्यामध्ये या मागणीसाठी हजारो शेतकरी रस्त्यांवर उतरले होते त्यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन केले.

पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्सवर चढाईचा प्रयत्न करत त्यांनी मोडतोड केली. शेतकरी आक्रमक झालेले पाहता त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करावा लागला.

खट्टर म्हणाले की, ‘‘ मॉन्सून लांबल्यानेच केंद्र सरकारने भात आणि बाजरीची खरेदी ११ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली होती. साधारपणे ही प्रक्रिया १ ऑक्टोबरपासूनच सुरू होणार होती. ही प्रक्रिया लवकर सुरू करण्यात यावी म्हणून शेतकरी आग्रही होते.’’ शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खट्टर यांनी केंद्रीय अन्नधान्य आणि ग्राहकव्यवहारमंत्री अश्‍विनी चौबे यांची भेट घेतली त्यानंतर अचानक निर्णय बदलण्यात आला. पंजाबमध्येही लवकरच ही खरेदी प्रक्रिया सुरू होईल, अशी ग्वाही चौबे यांनी दिली. दुसरीकडे आज मुख्यमंत्री खट्टर यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्याचा मारा करण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी पोलिसांनी उभे केलेले बॅरिकेड ट्रॅक्टरच्या साहाय्याने तोडून टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT