Padma Awards sakal
देश

Padma Awards : राज्यातील सहा मान्यवरांना पद्म सन्मान ; कामा, व्यास, डॉ. मेहता यांना पद्मभूषण, तर पापळकर, देशपांडे व मेश्राम यांना पद्मश्री

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी देशभरातील ६५ जणांना पद्म सन्मान प्रदान करण्यात आले, यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी देशभरातील ६५ जणांना पद्म सन्मान प्रदान करण्यात आले, यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. यापैकी तिघांना  पद्मभूषण तर तीन जणांना पद्मश्री सन्मान देण्यात आला.

अभिनेते चिरंजीवी, अभिनेत्री आणि नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना पद्मविभूषण सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील होर्मुसजी एन. कामा आणि कुंदन व्यास यांना साहित्य,  शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रासाठी तर डॉ. आश्विन मेहता यांना औषधी क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले, तसेच समाजसेवेसाठी शंकरबाबा पापळकर यांना, क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी उदय देशपांडे यांना, तर औषधी क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री सन्मान देण्यात आला.

या समारंभाला उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आदी यांसह अनेक नेते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या या समारंभात दोन पद्मविभूषण, आठ  पद्मभूषण आणि ५५ पद्मश्री प्रदान करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा हप्ता 'या' तारखेपासून खात्यात जमा होणार?

“लग्न करण्याची इच्छा…” प्राजक्ता माळी 'लग्नपंचमी' नाटक पाहिल्यानंतर म्हणाली...'आज कळलं की...'

Pimpri Chinchwad Accident news : भरधाव डंपरच्या धडकेत तरुण वकील साक्षी चौभेचा मृत्यू, पिंपरीत हळहळ

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT