देश

पद्म पुरस्कारासाठी डॉक्टरांचीच नावे केंद्राकडे पाठवणार: केजरीवाल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीतील केजरीवाल सरकारने पद्म पुरस्कारांसाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे केंद्राकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ही नावे १५ ऑगस्टपर्यंत सूचविण्याचे आवाहन दिल्लीकरांना या सरकारने केले आहे.

पद्म पुरस्कारांसाठी जनतेकडून नावे आल्यानंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अध्यक्षतेखालील समिती या नावांची छाननी करील. त्यानंतर निश्चित केलेली नावे १५ सप्टेंबरपर्यंत केंद्र सरकारकडे पाठविण्यात येतील. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच ही घोषणा केली आहे. केजरीवाल म्हणाले, "कोरोना काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी जनतेची खूप सेवा केली आहे. आपला जीव धोक्यात घालून त्यांनी इतरांचा जीव वाचविला. अनेक डॉक्टर, कर्मचारी अनेक दिवस घरी देखील गेले नाहीत.

लोकांची सेवा करताना या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, काही जणांचा मृत्यू झाला. त्यांचे ऋण आपल्यावर कायम राहणार आहे. आता त्यांचा सन्मान करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पद्म पुरस्कारांसाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे सुचविणार आहोत. दिल्ली सरकार ही नावे जनतेकडून मागविणार आहे. त्यासाठी ई मेल आयडी तयार केले आहे. त्यावर कोणतीही दिल्लीकर व्यक्ती डॉक्टर वा आरोग्य कर्मचाऱ्याचे नाव, त्याने केलेले कार्य याची माहिती पाठवू शकेल. त्यातून छाननी करून काही नावांची शिफारस पद्म पुरस्कारांसाठी केली जाणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी एकरी दीड कोटी रुपये मोबदला; सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करणार!

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

SCROLL FOR NEXT