Padma Vibhushan Padma Bhushan Padma Shri award goes to these people know here republic day Sakal
देश

Padma Awards: नायडू, चिरंजीवी पद्मविभूषण; कामा, राजदत्त, प्यारेलाल यांना पद्मभूषण; देशपांडे, पापळकर पद्मश्री, वाचा संपूर्ण यादी

माजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला बाली, अभिनेते चिरंजीवी, बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) आणि पद्मा सुब्रह्मण्यम यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला बाली, अभिनेते चिरंजीवी, बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) आणि पद्मा सुब्रह्मण्यम यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त, होरमूसजी कामा, आश्विन मेहता, माजी राज्यपाल राम नाईक, संगीतकार प्यारेलाल आणि कुंदन व्यास यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे,

राधा कृष्ण धिमन, मनोहर डोळे, झहीर काझी, चंद्रशेखर मेश्राम, कल्पना मोरपरिया, सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या पद्म सन्मानांची घोषणा गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली.

एकूण पाच जणांना पद्म भूषण, १७ जणांना पद्मभूषण आणि ११० जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानार्थींमध्ये ३० महिलांचा समावेश आहे. तसेच परदेशस्थ आठ नागरिकांचाही गौरव करण्यात येणार आहे.

भारतातील पहिल्या महिला हत्ती माहूत पार्वती बरुआ, आदिवासी पर्यावरणवादी चामी मुर्मू, मिझोरामचे सर्वांत मोठे अनाथाश्रम चालवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या संगथनकिमा आणि जळीतग्रस्तांवर उपचार करणाऱ्या प्लास्टिक सर्जन प्रेमा धनराज यांच्यासह ३४ `अनसंग हिरों`चा पद्मश्रीने सन्मान करण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जारी करण्यात आलेल्या या यादीमध्ये दक्षिण अंदमानचे सेंद्रिय शेतकरी के चेल्लाम्मल, सिकलसेल अॅनिमिया नियंत्रण कार्यक्रमाच्या विकासात पुढाकार घेणारे प्रख्यात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यझदी माणेकशा इटालिया यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

गेल्या ६० वर्षांपासून निरपेक्ष भावनेने मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतो आहे. आज मिळालेला पद्मभूषण सन्मान हा या कामाचा सन्मान आहे. मी माझे चरैवेती चरैवेती चे व्रत सुरू ठेवेन.

-राम नाईक, माजी राज्यपाल

माझ्यासाठी ही एक आनंददायी बातमी आहे. आत्तापर्यंत डोळ्यांच्या एक लाख ७० हजार शस्त्रक्रिया केल्या. दृष्टिदानाचे हे काम पुढे नेण्यासाठी या पुरस्काराने बळ मिळाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी हा सन्मान होणे ही कामाची खरी पावती आहे.

- डॉ. मनोहर डोळे

पद्म सन्मानार्थी

पद्मविभूषण (एकूण ५)

  • वैजयंतीमाला बाली (कला, तमिळनाडू)

  • कोनिडेला चिरंजीवी (कला, आंध्र प्रदेश)

  • एम. वेंकय्या नायडू (सार्वजनिक सेवा, आंध्र प्रदेश)

  • बिंदेश्‍वर पाठक (सामाजिक सेवा, बिहार) - मरणोत्तर

  • पद्मा सुब्रह्मण्यम (कला, तमिळनाडू)

पद्मभूषण (एकूण १७)

  • फातिमा बिवी (सार्वजनिक सेवा, केरळ)- मरणोत्तर

  • होर्मुसजी एन. कामा (साहित्य, शिक्षण-पत्रकारिता, महाराष्ट्र)

  • मिथुन चक्रवर्ती (कला, पश्‍चिम बंगाल)

  • सीताराम जिंदाल (उद्योग, कर्नाटक)

  • यंग लिऊ (उद्योग, तैवान)

  • अश्‍विन बालचंद मेहता (वैद्यकीय, महाराष्ट्र)

  • सत्यव्रत मुखर्जी (सार्वजनिक सेवा, पश्‍चिम बंगाल)- मरणोत्तर

  • राम नाईक (सार्वजनिक सेवा, महाराष्ट्र)

  • तेजस मधुसुदन पटेल (वैद्यकीय, गुजरात)

  • ओलानचेरी राजगोपाल (सार्वजनिक सेवा, केरळ)

  • दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त (कला, महाराष्ट्र)

  • तोगदान रिंपोचे (अध्यात्म, लडाख)- मरणोत्तर

  • प्यारेलाल शर्मा (कला, महाराष्ट्र)

  • चंद्रेश्‍वरप्रसाद ठाकूर (वैद्यकीय, बिहार)

  • उषा उथप (कला, पश्‍चिम बंगाल)

  • विजयकांत (कला, तमिळनाडू) - मरणोत्तर

  • कुंदन व्यास (साहित्य आणि शिक्षण-पत्रकारिता, महाराष्ट्र)

पद्मश्री (एकूण ११०)

  • खलिल अहमद (कला, उ.प्रदेश)

  • बद्रप्पन एम (कला, तमिळनाडू)

  • कालुराम बामणिया (कला, मध्य प्रदेश)

  • रिझवाना चौधरी बान्या (कला, बांगलादेश)

  • नसीम बानो (कला, उत्तर प्रदेश)

  • रामलाल बरेथ (कला, छत्तीसगड)

  • गीता रॉय बर्मन (कला, प.बंगाल)

  • पार्वती बारुआ (समाजसेवा, आसाम)

  • सर्वेश्‍वर बसूमैत्रे (कृषी, आसाम)

  • सोमदत्त बट्टू ( कला, हिमाचल)

  • तकदीर बेगम (कला, प. बंगाल)

  • सत्यनारायण बेलेरी ( कृषी, केरळ)

  • द्रोण भुयान (कला, आसाम)

  • अशोककुमार बिस्वास (कला, बिहार)

  • रोहन बोपन्ना (क्रीडा, कर्नाटक)

  • स्मृति रेखा चकमा (कला, त्रिपुरा)

  • नारायण चक्रवर्ती ( विज्ञान आणि अभियांत्रिकी, प. बंगाल)

  • ए. वेलू आनंदघारी (कला, तेलंगण)

  • रामचेत चौधरी (विज्ञान आणि अभियांत्रिकी, उत्तर प्रदेश)

  • के. चेल्लाम्मल (कृषी, अंदमान निकोबार)

  • चार्लट्टो चोपेन (योग, फ्रान्स)

  • रघुवीर चौधरी (साहित्य व शिक्षण, गुजरात)

  • जो डी‘क्रूज (साहित्य आणि शिक्षण, तमिळनाडू)

  • गुलाम नबी दार ( कला, काश्‍मीर)

  • चित्तरंजन देववर्मा (अध्यात्म, त्रिपुरा)

  • उदय विश्‍वनाथ देशपांडे (क्रीडा, महाराष्ट्र)

  • प्रेमा धनराज (वैद्यकीय, कर्नाटक)

  • राधाकृष्णन धिमन (वैद्यकीय, उत्तर प्रदेश)

  • मनोहर कृष्ण डोळे (वैद्यकीय, महाराष्ट्र)

  • पियरी सेल्विन फिलीओझाट (साहित्य आणि शिक्षण, फ्रान्स)

  • महावीर सिंग गुड्डू ( कला, हरियाना)

  • अनुपमा होस्केरे (कला, कर्नाटक)

  • याझदी माणेकशा इटालिया (वैद्यकीय, गुजरात )

  • राजाराम जैन (साहित्य व शिक्षण, उत्तर प्रदेश)

  • जानकी लाल (कला, राजस्थान)

  • रतन कहार (कला, पश्‍चिम बंगाल)

  • यशवंत सिंह काथोच (साहित्य व शिक्षण, उत्तराखंड)

  • ज्योत्स्ना चिनप्पा ( क्रीडा, तमिळनाडू)

  • झहिर काझी (साहित्य आणि शिक्षण, महाराष्ट्र)

  • गौरव खन्ना (क्रीडा, उत्तर प्रदेश)

  • सुरेंद्र किशोर (साहित्य व शिक्षण-पत्रकारिता, बिहार)

  • दसराई कोंडप्पा (कला, तेलंगण)

  • श्रीधर मकाम कृष्णमूर्ती (साहित्य व शिक्षण, कर्नाटक)

  • यानुंग जामोह लेगो (कृषी, अरूणाचल प्रदेश)

  • जॉर्डन लेप्चा (कला, सिक्कीम)

  • सत्येंद्रसिंह लोहिया (क्रीडा, म.प्र.)

  • विनोद महाराणा (कला, ओडिशा)

  • पूर्णिमा महातो (क्रीडा, झारखंड)

  • उमा माहेश्‍वरी डी. (कला, आंध्र)

  • दुखू माझी (सामाजिक सेवा, पश्‍चिम बंगाल)

  • रामकुमार मलिक (कला, बिहार)

  • हेमचंद मांझी (वैद्यकीय, छत्तीसगड)

  • चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (वैद्यकीय, महाराष्ट्र)

  • सुरेंद्रमोहन मिश्रा (कला, उत्तर प्रदेश)- मरणोत्तर

  • अली महंमद आणि घनी महंमद (संयुक्तपणे) (कला, राजस्थान)

  • कल्पना मोरप्रिया (उद्योग, महाराष्ट्र)

  • चामी मुर्मू (सामाजिक सेवा, झारखंड)

  • शशिंद्रन मुथुवेल (सार्वजनिक सेवा, पापुआ न्यू गिनीया)

  • जी. नचियार (वैद्यकीय, तमिळनाडू)

  • किरण नादार (कला, दिल्ली)

  • पाकारवुर चित्रन नंबुद्रीपाद (साहित्य व शिक्षण, केरळ)- मरणोत्तर

  • नारायणन ई. पी. (कला, केरळ)

  • शैलेश नायक (विज्ञान व अभियांत्रिकी, दिल्ली)

  • हरिश नायक (साहित्य व शिक्षण, गुजरात)- मरणोत्तर

  • फ्रेड नेग्रीट (साहित्य व शिक्षण, फ्रान्स)

  • हरी ओम (विज्ञान व अभियांत्रिकी, हरियाना)

  • भागवत पधान (कला, ओडिशा)

  • सनातन रुद्र पाल (कला, बंगाल)

  • शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर (सामाजिक सेवा, महाराष्ट्र)

  • राधेध्याम पारीक (वैद्यकीय, उत्तर प्रदेश)

  • दयाल परमार (वैद्यकीय, गुजरात)

  • विनोदकुमार पसायत (कला, ओडिशा)

  • सिल्बी पासा (कला, मेघालय)

  • शांती देवी पासवान व शिवन पासवान (कला, बिहार)

  • संजय अनंत पाटील (कृषी, गोवा)

  • मुनी नारायण प्रसाद (साहित्य आणि शिक्षण, केरळ)

  • के.एस. राजन्ना (सामाजिक कार्य, कर्नाटक)

  • चंद्रशेखर चन्नपटना राजान्नाचार (वैद्यकीय, कर्नाटक)

  • भगवतीलाल राजपुरोहित ( साहित्य आणि शिक्षण, मध्य प्रदेश)

  • रोमालो राम (कला, काश्‍मीर)

  • नवजीवन रस्तोगी ( साहित्य आणि शिक्षण, उत्तर प्रदेश)

  • निर्मल ऋषी (कला, पंजाब)

  • प्राण सभरवाल (कला, पंजाब)

  • गडाम समय्या (कला, तेलंगण)

  • संगथानकिमा (समाजसेवा, मिझोराम)

  • मचीहान सासा (कला, मणिपूर)

  • ओमप्रकाश शर्मा (कला, म. प्र.)

  • एकलव्य शर्मा (विज्ञान आणि अभियांत्रिकी, पं.बंगाल)

  • राम चांदेर सिहाग (विज्ञान आणि अभियांत्रिकी, हरियाना)

  • हरविंदर सिंह (क्रीडा, दिल्ली)

  • गुरविंदर सिंग (समाजसेवा, हरियाना)

  • गोदावरी सिंह (कला, उत्तर प्रदेश)

  • रविप्रकाश सिंह (विज्ञान आणि अभियांत्रिकी, मेक्सिको)

  • शेषमपत्ती शिवलिंगम (कला, तमिळनाडू)

  • सोमण्णा (सामाजिक सेवा, कर्नाटक)

  • केथावथ सोमलाल (साहित्य व शिक्षण, तेलंगण)

  • शशी सोनी (उद्योग, कर्नाटक)

  • उर्मिला श्रीवास्तव (कला, उ.प्र.)

  • नेपाळचंद्र सुत्रधार (कला, पश्‍चिम बंगाल)- मरणोत्तर

  • गोपीनाथ स्वेन (कला, ओडिशा)

  • लक्ष्मण तेलंग (कला, राजस्थान)

  • माया टंडन (समाजसेवा, राजस्थान)

  • ए.टी.जी.एल.बायी थम्पुरत्ती (साहित्य व शिक्षण, केरळ)

  • जगदीश त्रिवेदी (कला, गुजरात)

  • सानो वामुझो (सामाजिक सेवा, नागालँड)

  • बालकृष्ण पुथियावितील (कला, केरळ)

  • कुरेल्ला विठ्ठलाचार्य (साहित्य व शिक्षण, तेलंगण)

  • किरण व्यास (योग, फ्रान्स)

  • जगेश्‍वर यादव (सामाजिक सेवा, छत्तीसगड)

  • बाबूराम यादव (कला, उत्तर प्रदेश)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT