Rahul Gandhi 
देश

Rahul Gandhi : सरकारी बंगला रिकामा केल्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया म्हणाले, खरं बोलण्याची...

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचा 12 तुघलक लेन हा अधिकृत बंगला रिकामा केला आहे. बंगला रिकामा करून बाहेर पडताना राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी सत्य बोलण्याची किंमत चुकवली आहे. सत्य बोलण्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे.

राहुल गांधींचा बंगला रिकामा करून बाहेर पडत असताना, त्यांची बहीण प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत होत्या. यावेळी राहुल गांधींनी सरकारी अधिकाऱ्यांशी हस्तांदोलन करून त्यांना चाव्या दिल्या. संसदेतून अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधी यांनी आपला अधिकृत बंगला रिकामा केला आहे.

यावेळी प्रियंका गांधी देखील म्हणाल्या की, राहुल गांधी जो बोलले ते सत्य आहे. सरकारविरोधात बोलण्याची शिक्षा त्यांना मिळाली. तसेच लढाई सुरूच राहिलं, असही प्रियंका गांधी म्हणाल्या.

राहुल गांधी यांनी 14 एप्रिलला बंगल्यातून त्यांचे कार्यालय हलवले. काल (शुक्रवारी) संध्याकाळी त्यांनी शेवटचं शिफ्टींग केलं राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. हा बंगला राहुल गांधींना खासदार निवास म्हणून देण्यात आला होता. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधीना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी आपले सामान 10, जनपथ येथे हलवण्यास सुरुवात केली आहे. काल संध्याकाळी त्यांचे सर्व सामान हलवण्यात आले. तर राहुल गांधी 12 तुघलक लेन या शासकीय बंगल्याची चावी लोकसभा सचिवालयाला लवकरच परत करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT