श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील जंगलामध्ये मागच्या आठ दिवसांपासून सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (J&K Encounter) सुरु आहे. या चकमकीची भीषणता लक्षात घेतली, तर दहशतवाद्यांना पाकिस्तानी कमांडोजनी (pakistani commandos) प्रशिक्षित केलं आहे. लष्कर (army) आणि पोलिसातील (police) सूत्रांनी ही माहिती दिली. मागच्या सोमवारपासून ही चकमक सुरु असून आतापर्यंत भारताचे नऊ जवान शहीद झाले आहेत. यात दोन ज्यूनिअर कमिशनड ऑफिसर्सचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीरमधील अलीकडच्या काही वर्षातील ही अत्यंत भीषण अशी चकमक आहे. या एन्काऊंटरमध्ये कुठल्या दहशतवाद्यांचा खात्मा झालाय का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारण दहशतवाद्यांचे मृतदेह मिळालेले नाहीत. दहशतवादी लपवल्याचा संशय असलेल्या भागाला घेराव घातलेला आहे. आठ ते नऊ किलोमीटरच्या परिसरात घनदाट जंगलामध्ये ही चकमक सुरु आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
१० ऑक्टोबरच्या रात्री पूँछमध्ये नियंत्रण रेषेजवळ असलेल्या डेरा वाली गाली भागामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पहिली चकमक झाली. यात पाच जवान शहीद झाले. सैन्याकडून शोध मोहिम सुरु असताना गुरुवारी नार खास भागामध्ये घात लावून हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन जवान शहीद झाले. आणखी दोन जेसीओ बेपत्ता होते. अत्यंत कठीण अशा शोध मोहिमेनंतर त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले.
हे दहशतवादी इतक्या मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी घडवू शकले तसचं हजारो जवान तैनात असूनही निसटण्यात यशस्वी ठरले, निश्चित यांना पाकिस्तानच्या एलिट कमांडोसनी ट्रेन केलं आहे, असं लष्कर आणि पोलिसातील सूत्रांच म्हणणं आहे. "या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानी कमांडो असण्याचीही शक्यता आहे. त्यांचा खात्मा केल्यानंतरच हे चित्र स्पष्ट होईल" असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दलांना सर्तकतेने ऑपेरशन करण्याचं आणि आणखी जिवीतहानी होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लष्कराचे पॅरा कमांडोसही या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी या दहशतवाद्यांची घेराबंदी केली आहे. लवकरच या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.