Bangalore Bomb Blast sakal
देश

Bangalore Bomb Blast : बंगळूर बॉम्बस्फोटाचे पाकिस्तान कनेक्शन

कर्नाटकातील रामेश्वरम् कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट हा पाकिस्तानातील व्यक्तींनी रचल्याची बाब राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांच्या तपासातून समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : कर्नाटकातील रामेश्वरम् कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट हा पाकिस्तानातील व्यक्तींनी रचल्याची बाब राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांच्या तपासातून समोर आली आहे. बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे तपासातून उघड झाले आहे.

अब्दुल मतीन ताहा आणि मुसाविर हुसेन शाजिब हे बॉम्बस्फोटांचे सूत्रधार असल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे. पाकिस्तानी कर्नल या टोपणनावाच्या व्यक्तीशी त्याचे संबंध असून तर २०१९-२० पासून तो आयएस-अल-हिंद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहितीही ‘एनआयएला’ मिळाली आहे.

त्यामुळे एनआयएचे अधिकारी रामेश्वरम् कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात पाकिस्तानच्या सहभागाबाबत अधिक तपास करत आहेत. सूत्रांनी सांगितले की, कर्नल ही व्यक्ती मंगळूर येथे २०२२ च्या कुकर बॉम्बस्फोटात देखील सहभागी होती.

कुक्कार असे संशयित दहशतवाद्याचे नाव असून, तो अबुधाबी येथील कर्नल नावाने राहत असल्याचे समजले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी त्याचे संबंध आहेत आणि तो भारतात बॉम्ब हल्ल्यांचा कट रचत असल्याचा तपास संस्थांना संशय आहे. इस्लामिक स्टेटचे छोटे गट तयार करणे, त्यात स्थानिक तरुणांची भरती करणे हे त्याचे काम आहे. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT