drone attack
drone attack  Sakal
देश

Jammu Kashmir: पाकमधून आलेल्या ड्रोनमधून टाकलेल्या बाटल्या जप्त

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर/नवी दिल्ली : सातत्याने दहशतवादाशी झगडणाऱ्या जम्मू आणि काश्मीरवर १५ वर्षांनंतर पुन्हा द्रव स्फोटकांचे सावट आहे. सुमारे १५ वर्षांनंतर जम्मूत आंतरराष्ट्रीय सीमेनजीक पाकिस्तानातून आलेल्या ड्रोनने टाकलेल्या पांढऱ्या रासायनिक द्रवाच्या तीन बाटल्या सुरक्षा दलांनी जप्त केल्या. जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी नुकतीच प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. ही द्रव स्फोटके तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

ते यावेळी म्हणाले, की ही स्फोटके म्हणजे ट्रायनिट्रोटोल्युएन(टीएनटी) किंवा नायट्रोग्लिसरीन असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, यासंदर्भातील अंतिम अहवालाची प्रतिक्षा आहे. ही पांढऱ्या रंगाची रासायनिक स्फोटके सामान्यत: डायनामाइट तयार करण्यासाठी वापरली जातात. प्रत्येकी एक लिटरच्या तीन बाटल्यांमध्ये ही द्रव स्फोटके भरण्यात आली होती. पाकिस्तानातून २४ फेब्रुवारीला ही स्फोटके असलेल्या ड्रोनने उड्डाण केले होते.

त्यानंतर जम्मूत आंतरराष्ट्रीय सीमेनजीक ही स्फोटके जप्त करण्यात आली. ड्रोनच्या सखोल तपासणीनंतर पोलिसांना या द्रव स्फोटकांव्यतिरिक्त आयईडी, शस्त्रास्त्रे व इतर स्फोटकेही आढळली. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचे जम्मू लक्ष्य आहे. त्यांच्याकडून शहरात जातीय दंगल भडकाविण्याचा प्रयत्न केले जात असून पोलिसांनी ते हाणून पाडले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मात्र, गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार पाकिस्तानातून यापूर्वी काश्मीरात ड्रोन आल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, अशी द्रव स्फोटके काश्मीर खोऱ्यात टाकली गेल्याची शक्यता आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयकडून लष्करे तोयबा, जैशे मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांना सामरिक पाठिंबा दिला जात आहे. भारतीय हद्दीत शस्त्रास्त्रे टाकण्यासाठीही ड्रोनचा वापर केला जात आहे.

डिटेक्टर, श्वानपथकालाही ओळखता येत नाहीत

दक्षिण काश्मीरमधील दहशतवादी संघटनांकडून २००७ मध्येही द्रव स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर, अनेक वर्षे जम्मू आणि काश्मीरमध्ये द्रव स्फोटके आढळली नव्हती. मात्र, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आता द्रव स्फोटकांचा वापर करत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर संस्थेने दिली होती. डिटेक्टर किंवा श्नानपथकालाही द्रव स्फोटके ओळखता येत नाहीत. त्यामुळे, त्यांचा धोका मोठा असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.

वापर कशासाठी?

  • काश्मीरमधील दहशतवाद्यांसाठी या द्रव स्फोटकांची तस्करी केली जात असल्याची शक्यता

  • जम्मूतील मार्केटमध्ये गर्दीच्या ठिकाणी त्यांचा वापर करण्याचाही उद्देश असू शकतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT