Rahul Gandhi esakal
देश

Pakistan Mango Diplomacy: पाकिस्तानातून सात खासदारांसाठी आले खास आंबे; राहुल गांधींचाही समावेश, भाजपचा खळबळजनक दावा

BJP Latest News: दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तांनी विरोधी पक्षाचे नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींसह सात सदस्यांना आंब्यांच्या पेट्या पाठवल्या. दोन देशांमध्ये माधुर्याचे संबंध निर्माण व्हावेत, यासाठी पाकिस्तानने आंबे पाठवल्याचं म्हटलं जातंय.

संतोष कानडे

Pakistan Sends Mangos to MPs: मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तान मँगो डिप्लोमसी करताना दिसून येत आहे. भारताच्या विरोधी पक्षनेत्यांसोबत नातं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसून येतंय. राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातल्या सात खासदारांना पाकिस्तानातून खास आंबे आल्याचा दावा भाजपने केलाय.

भाजपने म्हटलंय की, दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तांनी विरोधी पक्षाचे नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींसह सात सदस्यांना आंब्यांच्या पेट्या पाठवल्या. दोन देशांमध्ये माधुर्याचे संबंध निर्माण व्हावेत, यासाठी पाकिस्तानने आंबे पाठवल्याचं म्हटलं जातंय.

भाजप नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केलीय. त्यात त्यांनी पाकिस्तानचे आंबे घेणाऱ्या खासदारांची नावे दिली आहेत. पोस्टमध्ये ते म्हणतात, पाकिस्तानी उच्चायुक्तांनी या निवडक सात खासदारांना आंब्याच्या पेट्या का पाठवल्या?

''राहुल गांधी, कपिल सिब्बल, शशी थरुर, मोहीबुल्लाह नदवी, जिया उर रहमान बर्क, अफजाल अन्सारी आणि इकरा हसन.. काहीच लोकांना कोणी का आंबे पाठवतो.. हे समजू शकतं.'' अशी पोस्ट अमित मालवीय यांनी केलीय.

पाकिस्तानसोबत काही डील तर होत नाहीये ना?- गिरीराज सिंह

दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे फायरब्रँड नेते गिरीराज सिंह यांनी थेट राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं की, राहुल गांधींना उत्तर प्रदेशचा आंबा आवडत नाही, पण त्यांच्या तुकडे-तुकडे गँगला पाकिस्तानतून जेव्हा आंबे येतात तेव्हा त्यांना त्याची चव आवडते. मँगो डिप्लोमसीच्या माध्यमातून पाकिस्तानसोबत काही डील तर होत नाही ना? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action: डॉमिनोजनंतर तुकाराम मुंढेंचा झेप्टो, इन्स्टामार्टसह फ्रुटीवर प्रहार; ११ तास छापेमारी, १४ परवाने निलंबित

BSNL ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाची 'डिजिटल भेट', एक रुपयात मोबाइल सेवा; २५ हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Independence Day Live Update : पुण्यातील विधानभवन ध्वजारोहण सोहळ्यात आसन व्यवस्थेवरून नीलम गोरे नाराज

D.B. Dhamanaskar: ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांचे निधन

SCROLL FOR NEXT