pakistan police patrolling on cycle video goes viral
pakistan police patrolling on cycle video goes viral  
देश

Video : पाक पोलिसांवर काय आलीयं वेळ...

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती अतिषय बिकट होत चालली असून, सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले जात आहेत. इंधनाचे दरही गगनाला पोहचले आहेत. पाकिस्तानमधील एक पोलिस सायकलवरून गस्त घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानमध्ये सरकारी कार्यालयांमधील बैठकीदरम्यान चहा-बिस्कीटांवर बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यालयाचे 41 लाख रुपयांचे वीज बिल भरले नसल्यामुळे वीज कोणत्याही क्षणी कापली जाऊ शकते. दुसरीकडे गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन युद्धाची भाषा करत आहे. जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे.

पाकिस्तानने दिलेल्या अणू हल्ल्याच्या धमक्यांनंतर पाकिस्तानातील पोलिसाचा व्हिडिओ पाहून नेटिझन्स हसू लागले आहेत. पाकिस्तानमधील पोलीस कर्मचाऱ्याच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडीओमध्ये एक पोलिस कर्मचारी सायकलवरून गस्त घालताना दिसत आहे. प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार तारेक फतेह यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ‘इकॉनॉमी ड्राईव्हवर पाकिस्तानी पोलिस’ असे त्यांनी या व्हिडिओला नाव दिले आहे. दरम्यान, संबंधित व्हिडिओ कधी काढण्यात आलाय याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु या व्हिडिओनंतर पाकिस्तानातील आर्थिक परिस्थितीचा अंदाज येत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून पाकिस्तान ट्रोल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT