india-china 
देश

भारत-चीनचे लष्कर आमने-सामनेच; गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकचे लष्करही तैनात

सकाळ न्यूज नेटवर्क / पीटीआय

नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील चीनच्या कुरापती सुरूच असून प्रत्यक्ष ताबा रेषेनजीकच्या प्रदेशात पीपल्स लिबरेशन आर्मीने वीस हजारांपेक्षाही अधिक लष्करी तुकड्या तैनात केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चीनने शिनजियांग प्रांतात लष्कराबरोबरच अत्याधुनिक शस्त्रसंपदा तैनात केली असून ती अवघ्या ४८ तासांमध्ये भारतीय सीमांवर पोचू शकते. चीनच्या या कारवायांना उत्तर देत भारतानेही सीमेवरील आपली ताकद वाढविली आहे.

दोन्ही देशांच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांत मंगळवारी पुन्हा बारा तास चर्चा झाली. यामध्ये विविध टप्प्यांत पण वेगाने तोडगा काढण्यावर भर देण्यात आला. प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे शुक्रवारी(ता.५) रोजी लेह आणि लडाखला भेट देत जवानांचे मनोधैर्य वाढविणार आहेत.सीमेवरील हा तणाव ऑक्टोबरपर्यंत कायम राहू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शिनजियांग प्रांताच्या उत्तर भागामध्ये दहा हजारांपेक्षा अधिक तुकड्या सज्ज आहेत. चीनकडून भारताच्या बाजूने हा प्रदेश सपाट असल्याने चिनी तुकड्या प्रत्यक्ष युद्ध आघाडीवर केवळ ४८ तासांमध्ये पोचू शकतात. भारतानेही गलवान खोरे, पँगाँग सरोवर आणि काही टेहळणी करणाऱ्या चौक्यांच्या परिसरामध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

दुसरीकडे पाकिस्ताननेही गिलगिट- बाल्टिस्तानमध्ये दहा हजार सैनिक तैनात केल्याने भारताचे  लष्कर सावध झाले आहे.

तणाव कमी करण्यास प्राधान्य
प्रत्यक्ष ताबा रेषेवरून सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया ही जटिल आणि गुंतागुंतीची असून विविध टप्प्यांमध्ये पण वेगाने हे लष्कर माघारी घेतले जावे यावर भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये मतैक्य झाले. सीमेवरील लष्करी तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांतील लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी तब्बल बारा तास चर्चा झाली. यामध्ये दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यावर भर दिला असला तरीसुद्धा सैन्य माघारीबाबत चीनचे अद्याप तळ्यात मळ्यात सुरूच आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘वेईबो’वरून मोदींची एक्झिट
चीनच्या ५९ ॲपवर बंदी घातल्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वेईबो या चिनी सोशल मीडिया संकेतस्थळावरून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता या संकेतस्थळावरील पंतप्रधान मोदींची चिनी भाषेतील संदेश आणि छायाचित्रे डिलीट करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये पहिल्यांदा चीनचा दौरा केला होता, तेव्हा हे अकाऊंट तयार करण्यात आले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT