देश

Gujarat : गुजरातमधील जाखूजवळ 200 कोटींच्या ड्रग्जसह पाकिस्तानी बोट जप्त

भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात एटीएसने भारतीय हद्दीत घुसलेली पाकिस्ताची बोट जप्त केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात एटीएसने भारतीय हद्दीत घुसलेली पाकिस्ताची बोट जप्त केली आहे. या कारवाईमध्ये 200 कोटी रुपयांचे 40 किलो ड्रग्ज जप्त केल्याचेही सांगितले जात आहे. पुढील तपास व कारवाईसाठी बोट व बोटीचे पाकिस्तानी चालक यांना जाखू येथे आणण्यात आले आहे. मागील काही महिन्यापासून गुजरात एटीएसकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे. याच कारवाईमध्ये काही महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईत अंमली पदार्थाचा साठा जप्त केला होता.

काही दिवसांपूर्वी गुजरात एटीएस आणि डीआरआयने कोलकाता येथे केलेल्या कारावाईत तब्बल 200 कोटीचे ड्रग्ज जप्त केले आहे. स्क्रॅप बॉक्समध्ये 40 किलो ड्रग्ज दुबई येथून भारतात आणले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

कोलकाता येथे करण्यात आलेल्या कारवाईत गुजरात पोलीस तटरक्षक बल, एनसीबी, पंजाब, दिल्ली पोलीस आणि अन्य एजन्सीने संयुक्त मोहीम राबवत ही कारवाई केली होती. या कारावाईमध्ये 12 गिअर बॉक्समध्ये लपवण्यात आलेले 200 कोटीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. हे ड्रग्ज दुबईच्या जेबेल अली पोर्ट येथून शिपिंग कंटेनरमध्ये पाठवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT