Pakistani girl held for entering India illegally to marry UP Security gaurd she met online  
देश

युपीतला सेक्युरिटी गार्ड अन् पाकिस्तानी तरुणीचं ऑनलाईन प्रेम; नेपाळमध्ये लग्नही केलं, पण नशीब…

सकाळ डिजिटल टीम

बेंगळुरू पोलिसांनी बनावट ओळख तयार करून भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी एका पाकिस्तानी तरुणीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इकरा जीवनी नावाची १९ वर्षीय तरुणी नेपाळ सीमेवरून गेल्या वर्षी भारतात दाखल झाली होती. तिचे लग्न उत्तर प्रदेशातील 25 वर्षीय सुरक्षा रक्षक मुलायम सिंह यादव याच्याशी झालं आहे. पण नशीबाने फार काळ साथ दिली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांची भेट एका गेमिंग अॅपद्वारे झाली होती. पोलिस सूत्रांनी सांगितले की, अॅपच्या माध्यमातून दोघांमध्ये मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ही तरुणी काही महिन्यांपूर्वी नेपाळला आली, जिथे दोघांनी लग्न केले. यानंतर हे जोडपे भारत-नेपाळ सीमा पार करून बिहारमध्ये पोहोचले होते.

इकराचे नाव बदलून रवा यादव ठेवलं

पोलीस सूत्रांनी सांगितले की, त्यानंतर यादव आणि इकरा बेंगळुरूला राहायला आले. येथे दोघे जुन्नासंद्रा येथे भाड्याच्या घरात राहू लागले आणि यादव सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. यादवने इकरा जिवानीचे नाव बदलून रवा यादव असे ठेवले आणि तिला आपली पत्नी असल्याचा दावा करत तिचे आधार कार्ड मिळवले. नंतर त्याने भारतीय पासपोर्टसाठी अर्जही केला.

अशाप्रकारे उघडकीस आली खरी ओळख

इंटेलिजन्स ब्युरोने (IB) इकरा जिवानीचा शोध घेतल्यानंतर मुलीची खरी ओळख उघड झाली कारण ती पाकिस्तानमधील तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. यानंतर आयबीने राज्याच्या गुप्तचर संस्थेला सतर्क केले. माहितीच्या आधारे बंगळुरू पोलिसांनी या जोडप्याची माहिती गोळा केली आणि त्यांच्या घरावर छापा टाकला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर दोघांना ताब्यात घेतले.

इकरा जिवानीला नंतर FRRO (विदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालय) अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आले, नंतर तुरुंगात पाठवण्यात आले आणि पुढील तपास सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले. मुलायम सिंह यादवलाही अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विदेशी कायदा आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या विविध कलमांतर्गत दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, घराचा मालक, गोविंदा रेड्डी, त्याच्यावरही संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कारण त्याने आपल्या घरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी व्यक्तीबद्दल पोलिसांना माहिती दिली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT