Anna DMK  
देश

Anna DMK : अण्णा द्रमुक कोणाचा? शिवसेनेसारख्या वादाचा लागला निकाल!

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई : माजी मुख्यमंत्री ई.के. पलानीस्वामी यांची आज अण्णाद्रमुकच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. यानुसार आता संपूर्ण पक्षावर पलानीस्वामी यांचे नियंत्रण राहणार आहे. अण्णाद्रमुकचे नेते पलानीस्वामी यांच्या सरचिटणीसपदाला आव्हान देणारी पनीरसेल्वम यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर पलानीस्वामी यांचा सरचिटणीसपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, पलानीस्वामी यांनी मरिना बिचवर एमजीआर आणि जयललिता यांच्या स्मृतिस्थळी जाऊन पुष्प अर्पण केले.

पक्षाचे सरचिटणीस पलानीस्वामी यांनी समर्थकांचे आभार मानले आहेत. पलानीस्वामी यांच्या निवडीने आनंदित झालेल्या नेत्यांनी, ‘अण्णाद्रमुक आणखी बळकट होईल,’ असा विश्‍वास व्यक्त केला.

निवडीनंतर पलानीस्वामी यांनी सदस्य नोंदणी अभियानाची घोषणा केली. नवीन सदस्यत्वासाठी आणि विद्यमान सदस्यांना मुदतवाढ देण्यासाठी अर्ज भरावा लागणार आहे. अर्जाचे शुल्क दहा रुपये ठेवण्यात आले आहे. 

अण्णाद्रमुकच्या ११ जुलै २०२२ च्या सर्वसाधारण बैठकीत पलानीस्वामी यांची सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्याचा ठराव मांडण्यात आला. याविरोधात ओ.पनीरसेल्वम आणि त्यांच्या समर्थकांनी याचिका दाखल केली होती. ती याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी अण्णाद्रमुकच्या मुख्यालयात हंगामी सरचिटणीस म्हणून पलानीस्वामी यांची निवड झाल्याचे जाहीर केले. 

पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावरून सुरू असलेल्या संघर्षाची धार ११ जुलै २०२२ च्या पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीत तीव्र झाली. या बैठकीत पनीरसेल्वम यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Vivo X Fold 6 ची भारतात एन्ट्री! 'या' दिवशी होणार लाँच; 200MP कॅमेरा अन् 7000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स!

Badminton Association: महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण लखानी

SCROLL FOR NEXT