देश

Pandit Nehru Last Interview : ''जिना कधीच स्वातंत्र्यलढ्यात नव्हते..'' नेहरुंची शेवटची मुलाखत; सांगितलं फाळणीचं कारण

''गांधी फाणळीच्या बाजूने होते का?'' या प्रश्नावर नेहरु म्हणतात, गांधीजी शेवटपर्यंत फाळणीच्या बाजूने नव्हते.. आणि मीही त्या बाजूने नव्हतो. परंतु अनेकांची भूमिका फाळणीच्या बाजूने होती.. रोजच्या कटकटीपेक्षा फाळणी झालेली कधीही चांगली, असंच सगळ्यांना वाटत होते. शेवटी फाळणीचा निर्णय झाला.

संतोष कानडे

नवी दिल्लीः स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या दुर्मिळ मुलाखतीची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियात शेअर केली जात आहे. प्रसार भारती अर्काइव्हजने ही क्लिप यु ट्युब चॅनेलवर शेअर केली आहे.

पंडित जवाहरलाल नेहरुंच्या या शेवटच्या मुलाखतीमध्ये ते स्वातंत्र्यलढा, फाळणी आणि त्यांची भूमिका याविषयी बोलत आहेत. फाळणी का झाली? आणि महात्मा गांधींची भूमिका काय होती, यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. मूळ इंग्रजीमध्ये ही मुलाखत उपलब्ध आहे.

''तुम्ही, गांधीजी आणि जिना ब्रिटनच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होतात..'' या पत्रकाराच्या विधानावर नेहरु म्हणतात, जिना कधीच स्वातंत्र्यलढ्यात नव्हते.. उलट त्यांनी त्याचा विरोध केला होता. मुस्लिम लीगची स्थापना १९११ मध्ये झाली होती. मुळात ही संघटना ब्रिटननेच सुरु केली होती. त्यांचा उद्देश भारतीयांमध्ये फूट पाडण्याचा होता... आणि ते यामध्ये काही प्रमाणात यशस्वी झाले. शेवटी भारताची फाळणी झाली.

''गांधी फाळणीच्या बाजूने होते का?'' या प्रश्नावर नेहरु म्हणतात, गांधीजी शेवटपर्यंत फाळणीच्या बाजूने नव्हते.. आणि मीही त्या बाजूने नव्हतो. परंतु रोजच्या भांडणांपेक्षा फाळणी अपरिहार्य असंच अनेकांना वाटत होतं त्याप्रमाणे ते स्वीकारावे लागले.

मुलाखतीमध्ये नेहरुंनी अनेक मुद्द्यांवर खुलासा केला होता. जिना हे स्वातंत्र्यलढ्यात नव्हते, असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे. शिवाय फाळणीवेळी कशी राजकीय परिस्थिती होती हेही त्यांनी स्पष्ट केलंय. प्रसार भारती अर्काइव्हजने याचा व्हिडीओ यु ट्युब चॅनेलवर शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT