IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

R Ashwin on Vaibhav Sooryavanshi: आयपीएल २०२६ मध्ये १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने प्लेऑफमध्ये सलग दोन सामन्यांत अफलातून खेळी करत सर्वांना प्रभावित केले. मात्र क्वालिफायर २ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध त्याला संघाची पुरेशी साथ मिळाली नाही. याबाबत आर अश्विनने राजस्थान रॉयल्सवर टीका केली.
R Ashwin on Vaibhav Sooryavanshi

R Ashwin on Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

IPL 2026 Vaibhav Sooryavanshi Marathi News: आयपीएल २०२६ स्पर्धेत (IPL 2026) १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) सर्वांनाच प्रभावित केले. त्याने प्लेऑफमध्ये सलग दोन सामन्यात अफलातून फलंदाजी केली, पण त्याचे दोन्ही वेळी शतक हुकले.

एलिमिनेटर सामन्यात त्याच्या ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले. पण क्वालिफायर २ सामन्यात वैभवला संघातील इतर खेळाडूंकडून अपेक्षित साथ मिळाली नाही, याबाबत आता आर अश्विननेही (R Ashwin) टीका केली आहे.

R Ashwin on Vaibhav Sooryavanshi
"आता त्याचे हातच बांधावे लागतील!" शुभमन गिल IPL 2026 Final आधी कोणाबद्दल असं बोलला?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com