Parachute Coconut Oil Success Story esakal
देश

Parachute Coconut Oil Success Story : पॅराशूट खोबरेल तेलाचा सर्वात मोठा ब्रँड बनाण्यामागची गोष्ट

मॅरिको कंपनीचे संस्थापक हर्ष मारीवाला यांनी पॅराशूट बनवण्याचं काम संपूर्ण देशात केलं. पण त्यांनी हा पराक्रम केला तरी कसा? जाणून घेऊ आजच्या लेखातून

सकाळ डिजिटल टीम

Parachute Coconut Oil Success Story : खोबरेल तेलाबद्दल बोलायचं झालं तर पॅराशूट हे नाव आज ही भारतातील खोबरेल तेलाच्या सर्वात मोठ्या ब्रँडपैकी एक आहे. भारतात खूप पूर्वीपासून खोबरेल तेल विकलं जात होतं पण पॅराशूटने ते प्रत्येक घरात पोहोचवले. मॅरिको कंपनीचे संस्थापक हर्ष मारीवाला यांनी पॅराशूट बनवण्याचं काम संपूर्ण देशात केलं. पण त्यांनी हा पराक्रम केला तरी कसा? जाणून घेऊ आजच्या लेखातून.

पॅराशूट कोकोनट ऑइल आणि सफोला रिफाइंड ऑइल हे मॅरिको कंपनीचे प्रमुख ब्रँड आहेत. कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे आहे. या कंपनीचा विस्तार आशिया आणि आफ्रिकेपर्यंत आहे. ही कंपनी जगभरातील 25 देशांमध्ये कार्य करते. फोर्ब्स कंपनीनुसार हर्ष मारीवाला यांची एकूण संपत्ती 263 अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे. कंपनीने 2022 मध्ये 9,610 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल नोंदवला होता.

पूर्वी खोबरेल तेल टिनच्या डब्यात विकले जायचे

हर्ष मारीवाला यांनी 80 च्या दशकात या व्यवसायात प्रवेश केला जेव्हा खोबरेल तेल टिनच्या डब्यात विकले जात होते. त्यांनी या धंद्यात प्लास्टिक आणायचे ठरवले. प्लास्टिकचा फायदा पाहून हर्ष मारीवाला यांना ही कल्पना सुचली. प्लॅस्टिक टिनपेक्षा स्वस्त आणि शेल्फमध्ये ठेवण्यासाठी अधिक सोयीस्कर होते. यासोबतच हा प्लॅस्टिकचा बॉक्स दिसायलाही आकर्षक होता. पण त्याची उठाठेव कठीण होती. यासाठी बाजारात खूप संशोधन झालं.

उंदीर सर्वात मोठा शत्रू होता

प्लॅस्टिकमध्ये खोबरेल तेल विकण्याबाबत केलेल्या संशोधनातून असे दिसून आले की ते सोपे नाही. खरे तर मॅरिकोच्या आधीही काही कंपनीने प्लास्टिकच्या डब्यात खोबरेल तेल आणलं होतं. पण त्यांची कल्पना यशस्वी होऊ शकली नाही. खरंतर प्लॅस्टिकच्या बाटलीत खोबरेल तेल ठेवण्यात उंदरांची मोठी अडचण होती. उंदरांना प्लास्टिक डबा कुरतडन सोपं होतं. त्यांना तेल आणि प्लॅस्टिकचं कॉम्बिनेशन आवडत होतं. बर्‍याच चर्चेनंतर त्याला सामोरे जाण्याचा एक अनोखा मार्ग सापडला.

खोबरेल तेलाचे पॅकेजिंग चौकोनी खोक्यांऐवजी गोल आकाराच्या बाटल्यांमध्ये करायचं असं ठरलं. बाटलीच्या गोलाकारपणामुळे, उंदीर डब्यावर दात घट्ट ठेवू शकत नव्हते. याशिवाय, त्याचे पॅकेजिंग अशा प्रकारे केले की एक थेंबही बाहेर पडणार नाही. यासाठी कंपनीने उंदरांवर प्रयोग केला जो यशस्वी झाला.

पॅराशूटची खास रचना

खोबरेल तेल टिनमधून प्लास्टिकमध्ये नेण्यासाठी मॅरिकोला 10 वर्षे लागली. यासोबत कंपनीची सर्वात मोठी अडचण ही होती की लोक पॅराशूटची कॉपी करत होते. त्यामुळे कंपनीच्या विक्रीत 20 टक्के घट झाली आहे. हे लक्षात घेऊन, मॅरिकोने एका विदेशी मोल्ड निर्मात्याशी हातमिळवणी करून एका विशिष्ट मोल्डची रचना खूप जास्त किंमतीत केली. त्याची कॉपी कोणीही करू शकलं नाही.

पॅराशूट नावामागील कथा

खोबरेल तेलाला पॅराशूट असं नाव देण्याची कथा खूप मनोरंजक आहे. हर्ष मारीवाला यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, दुसऱ्या महायुद्धात भारतीयांनी पहिल्यांदा पॅराशूटचा वापर केला होता. पॅराशूटच्या सहाय्याने सुरक्षित लँडिंग करणे त्याच्यासाठी आश्चर्यकारक होते. पॅराशूट लोकांच्या विश्वास आणि सुरक्षिततेशी संबंधित होता. त्यामुळे खोबरेल तेलाला देखील हेच नाव देण्यात आलं. हिवाळ्याच्या हंगामात सुमारे 500 दशलक्ष लोक पॅराशूट तेल वापरतात. (Motivational Story)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT