Paras Hospital File photo
देश

ऑक्सिजन मॉकड्रिल प्रकरण; व्हायरल व्हिडिओनंतर रुग्णालयाला टाळे

भाजप राजवटीत ऑक्सिजन आणि मानवता या दोन्हींची तीव्र कमतरता आहे. या गंभीर अपराधाला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरित कारवाई केली पाहिजे.

वृत्तसंस्था

भाजप राजवटीत ऑक्सिजन आणि मानवता या दोन्हींची तीव्र कमतरता आहे. या गंभीर अपराधाला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरित कारवाई केली पाहिजे.

लखनऊ : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील पारस रुग्णालयात मंगळवारी (ता.८) रुग्णांचा ऑक्सिजन बंद केल्याची घटना घडली. या रुग्णालयाविरोधात आता कडक कारवाई करण्यात आली आहे. पारस रुग्णालयातील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रुग्णालयाला टाळे ठोकण्यात येणार आहे. यासह रुग्णालयाच्या संचालकांविरूद्ध महामारी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासह, प्रधान गृह सचिवांनी पारस रुग्णालयाच्या मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पारस रुग्णालयाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये ऑक्सिजनची मॉक ड्रील घेण्यात आली. यामध्ये २२ गंभीर रुग्णांचा पाच मिनिटांत मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओनुसार, २२ जणांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या संचालकांचे म्हणणे आहे. ही घटना २६-२७ एप्रिल दरम्यान देशभरात ओढावलेल्या ऑक्सिजन तुटवड्या वेळची आहे. ()

२६ एप्रिल रोजी पारस रुग्णालयात ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची सरकारी नोंद आहे. जिल्हाधिकारी प्रभू नारायण सिंह म्हणाले की, २६ आणि २७ एप्रिल रोजी ऑक्सिजनची कमतरता जाणवली होती. पण प्रशासनाने आरोग्य विभागास तसेच रुग्णालयास ऑक्सिजन पोहोचविण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेतले होते. २६ एप्रिलला पारस रुग्णालयात ९७ रुग्ण दाखल करण्यात आले होते. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला होता.

काँग्रेस नेते राहुल गांधींनी देखील या प्रकरणी जबाबदार असलेल्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजप राजवटीत ऑक्सिजन आणि मानवता या दोन्हींची तीव्र कमतरता आहे. या गंभीर अपराधाला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरित कारवाई केली पाहिजे. या दु:खद घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT