Parliament Security Breach 
देश

Parliament Security Breach: "तो भगतसिंग यांचा खूप मोठा चाहता"; संसदेत घुसखोरी केलेल्या सागरच्या आईची प्रतिक्रिया

Sandip Kapde

Parliament Security Breach: लोकसभेच्या कामकाजादरम्यान व्हिजिटर गॅलरीतून लोकसभेत दाखल झालेला सागर शर्मा हा लखनऊच्या आलमबागमधील रामनगर भागातील रहिवासी आहे. तो ई-रिक्षा चालक आहे. दिल्लीतील एका निदर्शनात सहभागी होणार असल्याचे सांगून तो तीन दिवसांपूर्वी घरातून निघून गेला होता.

दरम्यान सागरच्या आईच्या प्रतिक्रिया दिली आहे. सागरच्या आईने सांगितले की, त्याने कधीही चुकीचे काही केले नाही. दिल्लीला जात असल्याचे सांगून तो निघून गेला होता. मित्रांना भेटायला जाणार आहे आणि परत येवून आपलं काम करणार असल्याचं तो सांगत होता. त्याने देशभक्तीची अनेक पुस्तके वाचली होती. तो भगतसिंगचा खूप मोठा चाहता होता. माझ्या मुलीने मला सांगितले की तो डायरी लिहायचा"

पोलिसांनी सागरची डायरी जप्त केली आहे. सागर शर्माच्या लखनऊ येथील घरातून ही डायरी सापडली आहे. घर सोडण्याची वेळ जवळ आली आहे असे डायरीत लिहिले आहे. यंत्रणा या सर्व बाबी तपासत आहेत. सागर बंगळुरूला का गेला. तिथे तो कोणाच्या संपर्कात होता? सर्वच ठिकाणी तपास सुरू आहे.

पोलिस उपायुक्त पश्चिम राहुल राज यांनी सांगितले की, तपास यंत्रणा सागरच्या डायरीत लिहिलेल्या तथ्यांचा तपास करत आहेत. सागरच्या घरात सापडलेल्या डायरीवरून त्याचे बंगळुरू आणि म्हैसूरशी असलेले कनेक्शन सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवादविरोधी पथक (एटीएस) तपासत आहेत.

याशिवाय सायबर क्राईम सेलची दोन पथके सागरच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटची चौकशी करत आहेत. सागर सोशल मीडियावर खूप सक्रिय होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20I Ranking : कुलदीप यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मध्येच बाहेर करणे पडले महागात, आयसीसीने दिला दणका...

Thane News: पाणी टंचाईच्या झळा, पण बेकायदा वॉशिंग सेंटरमधून सर्रास पाण्याची उधळपट्टी, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

Ozar News : पोलीस बनले समुपदेशक! नाशिकमध्ये अपहरणाचा बनाव करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पोलिसांनी केले समुपदेशन, पालकांना दिला योग्य सल्ला

Mangalwedha News : मंगळवेढ्यात नगराध्यक्षपदासाठी उच्च शिक्षित महिलांच्या दावेदारीची चर्चा

Nashik Crime : नाशिकमध्ये 'एमडी' तस्कराच्या मुसक्या आवळल्या; ६५ हजार रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल.

SCROLL FOR NEXT