Parliament Security Breach Esakal
देश

Parliament Security Breach: प्रथमदर्शनी दहशतवादी हल्ला वाटला! खासदार धैर्यशील माने यांचे सभागृहाच्या गॅलरीतून ‘आँखों देखी’

संसदेतील आजच्या प्रकाराने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीही समोर आल्याचेही खासदार माने म्हणाले.

सकाळ वृत्तसेवा

‘‘संसदेचे कामकाज प्रेक्षक गॅलरीतून कसे दिसते, हे पाहण्यासाठी मी काही मित्रांसोबत आज गॅलरीत बसलो होतो. त्याच गॅलरीच्या पहिल्या रांगेत ते दोघे बसलेले होते. काही वेळाने सुरक्षारक्षकांनी या गॅलरीतील एक रांग रिकामी करण्यासाठी लोकांना उठवले. त्यावेळी त्या दोघांची चुळबूळ सुरू झाली. पण त्याकडे फारसे लक्ष गेले नाही.. गॅलरीतील एक रांग रिकामी झाली आणि काही कळायच्या आत यापैकी एकाने गॅलरीतून थेट संसदेत उडी घेतली. अगोदर हा दहशतवादी हल्लाच वाटला,’’ अशा शब्दांत हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.(Latest Marathi News)

माने म्हणाले, ‘‘माझे काही पुण्याचे मित्र संसदेचे कामकाज पाहायला आले होते. त्यांना मी पास दिला. मीच सोबत असेल तर त्यांना लवकर आत सोडले जाईल, म्हणून त्यांना घेऊन गेलो. मलाही गॅलरीतून कामकाज कसे दिसते, याची उत्सुकता होती. ते दोघे पहिल्या रांगेत तर मी व माझे मित्र तिसऱ्या रांगेत होतो. एका व्यक्तीला ४५ मिनिटेच गॅलरीत बसता येते. या नियमाने सुरक्षारक्षकांनी दुसरी रांग रिकामी करण्यास सुरुवात केली, त्यावेळी दोघेही चुळबूळ करू लागले; पण त्यावेळी लक्षात आले नाही.’’ (Marathi Tajya Batmya)

ते म्हणाले, ‘‘सभागृहात काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे भाषण झाल्यानंतर या दोघांपैकी एकाने काही कळायच्या आत गॅलरीतून थेट सभागृहातच उडी घेतली. त्यानंतर दुसराही उडी मारण्याच्या प्रयत्नात गॅलरीलाच लटकला. प्रचंड सुरक्षा व्यवस्था असतानाही तरुण आत आल्याने संसदेत एकच गोंधळ उडाला."(Latest Marathi News)

"त्यात पहिल्यांदा उडी मारलेल्या तरुणाने पायातील बूट काढून त्यातील काही वस्तू काढण्याचा प्रयत्न सुरू केला. या बुटात बंदूक किंवा बॉम्बसदृश काही असेल, या भीतीने सुरक्षारक्षकांनी संसदेसह गॅलरीही रिकामी केली. सुरवातीला मला हा हल्लाच वाटला; पण नंतर त्या तरुणाने बुटातून स्प्रे काढला. तो सगळीकडे मारल्यानंतर त्याचा फटक्यासारखा वास घशात गेल्याने अनेकांना त्रास होऊ लागला. नंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडले.’’ (Marathi Tajya Batmya)

संसदेतील आजच्या प्रकाराने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीही समोर आल्याचेही खासदार माने म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Election :व्यक्ती की पक्ष? मागील अपयशानंतर पंचवटी 5 मध्ये भाजपची हवा; इच्छुकांमुळे बंडखोरीची शक्यता

तेव्हा स्थळं यायची आणि अजूनही येतात पण... लग्नाविषयी विचारणाऱ्यांचे मुक्ता बर्वेने टोचले कान; 'माझं आयुष्य हे...'

Latest Marathi News Live Update : भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटम यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक

Nashik Fire Accident : दुःखाचा डोंगर! मुलीच्या लग्नासाठी जपलेली तीन लाखांची रक्कम आगीत खाक, आईचे स्वप्न भंगले

Tejas crash : दुबई एअर शो मध्ये क्रॅश तेजस विमानाच्या पायलटचा शेवटचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT