Pratam Simha 
देश

Parliament Security Breach: लोकसभेत घुसखोरी करणाऱ्यांना ज्यांच्या शिफारसीनं पास मिळाले ते खासदार कोण? जाणून घ्या सविस्तर

लोकसभेचं कामकाज सुरु असताना भर सभागृहात गॅलरीतून उडी घेत स्मोक क्रॅकर उडवण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : संसदेची कडक सुरक्षा व्यवस्था भेदून लोकसभेचं कामकाज सुरु असताना भर सभागृहात गॅलरीतून उडी घेत दोन तरुणांकडून स्मोक क्रॅकर उडवण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या दोघांसह संसद भवनाच्या बाहेरुन दोघांना अशा एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची आता कसून चौकशी सुरु आहे.

अद्याप ते कोण आहेत? कोणत्या हेतून त्यांनी हे कृत्य केलं? हे कळू शकलेलं नाही. पण त्यांना संसदेत एन्ट्रीसाठी एका खासदाराच्या शिफारशीनं पास उपलब्ध करुन दिले तो खासदार कोण आहे? जाणून घेऊयात. (Parliament Security Breach who is MP Pratap Simha Because of which infiltrators got entry pass to LokSabha)

म्हैसूरचे खासदार

खासदार प्रताप सिम्हा (MP Pratam Simha) यांच्या शिफारशीनं संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणांना पास मिळाले होते. हे खासदार प्रताप सिम्हा कर्नाटकातील म्हैसूरचे खासदार आहेत. त्यांचं वय ४२ वर्षे असून ते भाजपचे खासदार आहेत. (Marathi Tajya Batmya)

प्रताप सिम्हा यापूर्वी पत्रकार होते. त्यांनी कन्नड भाषेतील विविध वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केलं आहे. प्रताप सिम्हा हे कट्टर हिंदुत्ववादी राजकारणासाठी ओळखले जातात. ते कर्नाटकातील भारतीय जनता युवा मोर्चाचे अर्थात भाजयुमोचे अध्यक्ष आहेत.

दैनिकातून केली पत्रकार म्हणून करियरला सुरुवात

प्रताप सिम्हा यांचा जन्म कर्नाटकमधील सुंदर हिलस्टेशन सकलेशपूर इथं झाला. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात विजया कर्नाटक या वर्तमानपत्राच्या पत्रकाराच्या रुपानं झाली. हे वर्तमानपत्र कर्नाटकातील एक दैनिक आहे. (Latest Marathi News)

त्यानंतर 'बेट्टाले जगत्तू' (नग्न जग) नावाच्या स्तंभलेखनामुळं चर्चेत राहिले. त्यांचा हे लेखन जगातील विविध घडामोडींविरोधात टीकात्मक असं होतं. त्यानंतर पुढे त्यांनी २००८ मध्ये पंतप्रधान मोदींचं आत्मचरित्र लिहिलं, ज्याच नाव त्यानं 'नरेंद्र मोदी : यारु थुलियादा हादी' (Narendra Modi : The Untrodden Road) ठेवलं होतं.

२०१४ मध्ये राजकारणात प्रवेश

सन २०१४ मध्ये राजकारणात एन्ट्री घेतली त्यानंतर ते लगेचच भाजयुमोचे अध्यक्ष बनले. त्यांनी २०१४ मध्ये म्हैसूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला ३२००० मतांनी पराभूत केलं. त्याचबरोबर प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे ते सदस्य देखील होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT