Parliament Security Sakal
देश

Parliament Security: संसदेत सर्वसामान्य लोकांची एन्ट्री कशी होते? कशी आहे तिथली सुरक्षा व्यवस्था?

Parliament Security Breach: संसद भवनाच्या सुरक्षेवर आज एका घटनेनं मोठं प्रश्न चिन्ह निर्माण झालं.

अक्षता पांढरे

Parliament Security Breach: भारताचं नवीन संसद भवन ज्याच्या भव्यतेविषयी, सुरक्षेविषयी अख्ख्या जगात बोलबाला केला गेला होता. पण याच नवीन संसद भवनाचे उद्धाटन होऊन वर्षही झालं नाही. त्याचं संसद भवनाच्या सुरक्षेवर आज एका घटनेनं मोठं प्रश्न चिन्ह निर्माण झालं.

संसदेचे हिवाळी अधिवेशनादरम्यान कामकाज सुरू असतानाच सुरक्षा भेदून दोन अज्ञात व्यक्ती घुसल्याच्या प्रकार घडल्याने खळबळ उडाली. दोन तरुणांनी सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीतून टिअर गॅस कॅन घेऊन खासदार बसतात तेथे उड्या मारल्या आणि घोषणाबाजी केली.

या घटनेनं २२ वर्षांपुर्वीच्या जखमेची खपली काढली. आजच २२ वर्षांपुर्वी म्हणजे १३ डिसेंबर २००१ ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी संसदेवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात ९ पोलीस कर्मचारी शहिद झाले होते. त्यानंतर आजही ही घटना घडली.

आता या दोन्ही घटना वरवरून जरी वेगळ्या दिसत असल्या तरी या घटनेनं संसदेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे. त्यामुळे संसदेत एन्ट्री कशी होते? तिथली सुरक्षा व्यवस्था नेमकी कशी आहे जाणून घेऊ.

या संसदेच्या सुरक्षेसाठी PSS म्हणजेच पार्लिमेंट सिक्यूरीटी सर्विसेस ही विशेष यंत्रणा काम करते. सहसचिव हे PSSचे प्रमुख असतात. यात लोकसभेची सुरक्षा ही लोकसभेचे सुरक्षा संचालक पाहतात. राज्यसभेची सुरक्षा राज्यसभेचे सुरक्षा संचालक पाहतात. दिल्ली पोलीस, NSG, CRPF, IB या संस्था सुरक्षेत असतात.

अशा भरभक्कम सुरक्षेतही सर्वसामान्य व्यक्तीला संसदेत एन्ट्री करता येते. पण सगळ्यांना नाही त्यासाठी एक स्पेशल पास असतो. हा पास आपल्याला संसदेचा कोणताही राजपत्रित अधिकारी किंवा खासदार तुम्हाला मिळवून देऊ शकतो. पण त्यासाठी तुमच्या नावाची शिफारस करावी लागते.

त्यानंतर सगळ्या गोष्टींची शहानिशा करून तुम्हाला पास दिला जातो. जो फक्त एका दिवसासाठी असतो. आणि महत्वाचं म्हणजे संसदेत येणारे विद्यार्थी, पत्रकार, पर्यटक यांना परवानगी देणे हे देखील PSSचे काम असतं.

पास मिळालेली व्यक्ती संसदेतील राज्यसभेची अंतर्गत लॉबी, लोकसभा अंतर्गत लॉबी आणि सेंट्रल हॉल पाहू शकतो. एवढंच नाही पास मिळाल्यानंतर तुम्ही संसदेच कामकाज लाईव्ह देखील पाहू शकता पण त्यासाठी फक्त १ तासाचा वेळ आहे.

यात अर्धा तास राज्यसभा आणि अर्धा तास लोकसभेसाठी आहे. दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचा पास असतो. हिरवा पास लोकसभेसाठी आणि मरून रंगाचा पास राज्यसभेसाठी असतो. १ तासानंतर या पाससह आपल्याला सभागृह सोडावं लागतं.

त्यामुळे आजचा जो काही प्रकार घडला ज्या तरूणांनी संसदेत एन्ट्री केली. हे तरूण म्हैसूर येथील भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावावर लोकसभा व्हिजीटर पास घेऊन आले होते. महत्वाचं म्हणजे यातील एक तरूण हा महाराष्ट्रीत लातुरचा आहे. अमोल शिंदे असं या तरुणाचं नावं.

या प्रकरणात ४ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आता पुढे काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल. पण तरीही आज झालेल्या घटनेमुळे ही सुरक्षाव्यवस्था कितीपत विश्वसनीय आहे या बद्दल शंका निर्माण झाली आहे हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निळी मफलर डोळ्यावर गॉगल, राज ठाकरे मेळाव्याच्या स्थळी दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT