Parliament Special Session 
देश

One Nation One Election: 'एक देश, एक निवडणूक होणार?', केंद्रानं बोलावलं संसदेचे विशेष अधिवेशन

Sandip Kapde

One Nation One Election: एक देश एक निवडणूक, असा अध्यादेश सरकार आणू शकते. 2014  मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हा विचार पुढे आला होता. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान मोदी सराकरने संसदेचे महत्वाचे अधिवेशन बोलावले आहे. 5 दिवसांचे हे विशेष अधिवेशन असेल. या विशेष अधिवेशनात नवा अध्यादेश आणल्या जावू शकतो.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट करत संसदेच्या अधिवेशनाबाबत माहिती दिली. यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. गणेशोउत्सवाच्या काळात हे अधिवेशन बोलावल्याने या अधिवेशवनात काय महत्वाचे निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिवेशनात 5 महत्वाच्या बैठका असतील, असे देखील जोशी यांनी सांगितले आहे.

चांद्रयान 3 बाबत देखील या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. पाच दिवसांच्या अधिवेशनात 10 अध्यादेश आणण्याची सरकारची तयारी आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये एक देश एक निवडणूक, असा अध्यादेश आणल्या जावू शकतो.

विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुका एकाच वेळी घेण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे करत आहेत. या निर्णयामुळे निवडणुका घेण्याचा खर्च कमी होईल आणि प्रशासनाचा वेळही वाचेल, असा त्यांचा तर्क आहे.  

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुका देखील उंबरठ्यालर आल्या आहेत. त्यापूर्वी ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे केंद्रात लवकर निवडणुका होऊ शकतात किंवा पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पुढील वर्षी एप्रिल-मेपर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

2024 च्या सार्वत्रिक निडणुकांव्यतिरीक्त पुढील वर्षी आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये देखील निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये 'एक राष्ट्र, एक निवडणूक' अशी भूमिका मांडली होती. निवडणुकीच्या सततच्या चक्रामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसून येते, तर विकासकामांना फटका बसतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT