Narendra Modi 
देश

ना 'वन नेशन, वन इलेनक्शन', ना UCC विधेयक; विशेष अधिवेशनात 'या' मुद्दांवर होणार विचारमंथन

रवींद्र देशमुख

मुंबई - येत्या 18 सप्टेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होत आहे. या विशेष अधिवेशनात सरकार 'वन नेशन, वन इलेनक्शन' असा प्रस्ताव आणू शकते, अशी चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू होती. त्याचप्रमाणे समान नागरी संहिता (Uniform Civil Code) आणि इंडिया विरुद्ध भारत या मुद्द्यांवरही विचारमंथन अपेक्षित होते. मात्र आता विशेष अधिवेशनाबाबत माहिती समोर आली असून या तीनही मुद्दांवर चर्चा होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत 'जनसत्ता'ने वृत्त दिलं आहे.

केंद्र सरकार या विशेष अधिवेशनात अॅडव्होकेट्स अमेंडमेंट बिल, प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पीरियडिकल बिल, पोस्ट ऑफिस बिल आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त नियुक्ती सेवा शर्ती विधेयक मांडणार आहे. विशेष म्हणजे, यात 'वन नेशन वन इलेक्शन', किंवा समान नागरिक कायद्याबाबत प्रयत्नशील नसल्याचं सांगण्यात येत आहे.

अधिवक्ता (सुधारणा) विधेयक 2023 आणि प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक 2023 या वर्षी राज्यसभेने मंजूर केले होते. आता ते विशेष अधिवेशनात लोकसभेत मांडले जाणार आहे. त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस विधेयकही राज्यसभेत मांडण्यात आले आहे, त्यामुळे आता विशेष अधिवेशनात त्यावर चर्चा होणार आहे.

दरम्यान, सरकारच्या अजेंड्यावर विरोधक फारसे खूश नाहीत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी कोणताही महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जात नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच अधिवेशनात 'एक देश एक निवडणूक', यूसीसी आणि इंडियाविरुद्ध भारत या मुद्द्यांवर जोरदार चर्चा होईल अशी अटकळ होती. मात्र सरकारला हे मुद्दे टाळायचे असं दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bankipur Election Result 2026 : भाजपाला मोठा धक्का! ३० वर्षांचा गड ढासळला; बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा दणदणीत विजय

Dimbhe Dam : डिंभे धरणाचा विसर्ग वाढला; लाखणगावचा पूल पाण्याखाली, बेल्हे-जेजुरी महामार्गावरील वाहतूक ठप्प

Latest Marathi News Live Update : ''गुन्हेगाराला मुख्यमंत्री बनवलं तर....''; बांकीपूरच्या निकालावर काय म्हणाले प्रशांत किशोर?

'पूर्ण सिस्टमच त्याला वाचवतेय...'; बृजभूषण यांच्या निर्दोष सुटकेनंतर Vinesh Phogat काय म्हणाली? मोठं पाऊल उचलण्याचा इशारा

Temple Development : डोंगरगाव शिवच्या तोंडेश्वर महादेव मंदिराला तीर्थक्षेत्र 'ब' वर्गाचा दर्जा; आमदार अनुराधा चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT