Mansukh Mandaviya google
देश

देशात ऑक्सिजनअभावी किती जणांचा मृत्यू? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात कोरोना काळात ऑक्जिनच्या कमतरतेमुळे मृत्यू (Oxygen Shortage Deaths) झालेल्यांचा आकडा राज्यांना मागविला होता. मात्र, फक्त १९ राज्यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. यामध्ये महाराष्ट्राचा कुठेही समावेश नसून महाराष्ट्राने अद्याप आकडेवारी दिलेली नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी लोकसभेत दिली. कोरोना काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किती जणांचा मृत्यू झाला? असा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

देशात किती जणांचा मृत्यू?

देशात ऑक्सिनच्या कमरतेमुळे किती जणांचा मृत्यू झाला याबाबतची माहिती सर्व राज्यांना पत्र लिहून मागवली होती. त्याला १९ राज्यांनी प्रतिदास दिला. यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, तेलंगणा, आसाम, पंजाब, उत्तराखंड, त्रिपुरा, दादरा नगर हवेली, दीव-दमण, अंदमान, निकोबार, ओडिशा, जम्मू-काश्मीर, लडाख, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, पाँडीचेरी, अरुणाचल प्रदेश, नागालँड, सिक्कीम, झारखंड, हिमाचल प्रदेश हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. तसेच पंजाबने चार रुग्णांचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याची माहिती लेखी स्वरुपात दिली आहे, असं मनसुख मांडविया यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन हा डेटा देण्याबाबत सांगितले होते. तरीही अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नाही. महाराष्ट्रानेही याबाबत माहिती दिली नाही. या मुद्द्यावरून आधी देखील राजकारण सुरू होतं. दुर्दैवाने आताही हे राजकारण सुरू आहे. हा राजकारणाचा विषय नाही, असं मनसुख मांडविया म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

Marathwada Rain: ५० दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस; हिंगोली, जालना, नांदेडसह धाराशिवमध्ये सरी

Global Warming: ‘सुपर एल निनो’मुळे १५ हजार मृत्यूचा धोका; शिकागो विद्यापीठाचा इशारा, जमीन आणखी तापणार

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Farmers: पंचनामे कागदावर नको, थेट बांधावर करा; महसूलमंत्री बावनकुळे यांचे निर्देश; ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, तलाठींची उपस्थिती बंधनकारक

SCROLL FOR NEXT