Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Tukaram Mundhe Issues Stern Warning Over Adulteration: आता 'मद्या'वरही 'एफडीए'चे लक्ष राहणार आहे. खानपानाच्या गुणवत्तेत तडजोड खपवून घेणार नाही; असा तुकाराम मुंढे यांनी इशारा दिला आहे.
From Milk and Paneer to Liquor: FDA Expands Quality Checks Under Tukaram Mundhe

From Milk and Paneer to Liquor: FDA Expands Quality Checks Under Tukaram Mundhe

ESakal

Updated on

'खाद्यपदार्थांप्रमाणेच मद्य आणि मद्यार्क नसलेल्या पेयांमध्ये भेसळीच्या तक्रारी वाढल्या असून गावठी दारूमध्ये विषारी रसायन मिसळल्याने मृत्यू झाल्याच्या घटना पुण्यात घडल्या आहेत. पेयजलांची गुणवत्ता, त्याचे उत्पादन आणि लेबलिंग यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. दूध, पनीर, खाद्यतेलांप्रमाणेच 'अल्कोहोलिक' आणि 'नॉन अल्कोहोलिक' पेयांचीही तपासणी करणार असून, खानपानाच्या गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,' असा खरमरीत इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com