Parliament winter Session 2023 visitor jumped into LS chamber from gallery was seen leaping over benches  
देश

Breaking : संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक! अज्ञात दोघांचा सुरक्षा भेदून सभागृहात प्रवेश; पाहा व्हिडीओ

या प्रकारानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

रोहित कणसे

संसदेचे हिवाळी अधिवेशनादरम्यान कामकाज सुरू असतानाच संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकसभा सभागृहात कामकाजादरम्यान दोन अज्ञात व्यक्ती घुसल्याच्या प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुणांनी सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीतून टिअर गॅस कॅन घेऊन खासदार बसतात तेथे उड्या मारल्या. कामकाजादरम्यान घुसखोरी केलेल्या दोघांपैकी एकाचे नाव सागर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही खासदाराच्या नावाने असलेल्या लोकसभा व्हिजीटर पासवर संसदेत आले होते. खासदार दानिश अली यांनी सांगितले की, हे दोघे म्हैसूर येथील भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नवावर लोकसभा व्हिजीटर पास घेऊन आले होते.

काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, दोन तरूणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. त्यांनी काहीतरी फेकलं, ज्यामधून गॅस बाहेर येत होता. त्यांना खासदारांनी पकडलं आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर काढलं. यानंतर सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. हे निश्चितपणे सुरक्षेचे उल्लंघन आहे कारण आज आपण 2001 मध्ये ज्यांनी बलिदान दिले त्यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत.  

नेमकं काय झालं?

खासदारांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेत शुन्य प्रहरादरम्यान भाजप खासदार खरगेन मुर्मू बोलत होते, तेव्हा एका व्यक्तीने प्रेक्षक गॅलरीमधून उडी मारली. यानंतर दुसऱ्या व्यक्तीने देखील त्याच्या मागोमाग सभागृहात उडी मारली. यानंतर संसद सभागृहात खळबळ उडाली. काही खासदारांनी दोन तरुणांना पकडलं, यानंतर संसदेच्या सुरक्षारक्षकांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांना संसद मार्ग पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या अँटी टेरर युनिटच्या स्पेशल सेल कडून या घुसखोरी करणाऱ्यांची चौकशी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी : नाईक

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT