Parliament Sakal
देश

पावसाळी अधिवेशनापूर्वी 18 जुलैला सर्वपक्षीय बैठक

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 18 जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या एकदिवस आधी ही बैठक होत आहे. सकाळी अकरा वाजता ही बैठक पार पडेल. भारतीय जनता पक्षाची कार्यकारी बैठक याच दिवशी होण्याची शक्यता आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. पावसाळी अधिवेशनाला 19 जुलैपासून सुरुवात होत आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतरचे हे पहिले अधिवेशन होत आहे. पावसाळी अधिवेशन 19 दिवस चालणार असून ते 13 ऑगस्टला संपेल.

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास एका महिन्यापर्यंत चालणाऱ्या या मॉन्सून सत्रादरम्यान 20 बैठका होण्याची शक्यता आहेत. सामान्यत: संसदेचं पावसाळी अधिवेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होतं आणि स्वातंत्र्यदिनाच्या आधी समाप्त होतं. सूत्रांनी सांगितलंय की, संसदीय कार्यविषयक कॅबिनेट समितीने या अधिवेशनाच्या कार्यकाळासंदर्भात शिफारस केली आहे. त्यांनी म्हटलंय की, सत्राच्या दरम्यान संसद परिसरात कोरोनाशी निगडीत सर्व प्रकारच्या प्रोटोकॉलचं पालन केलं जाईल. या अधिवेशनाच्या दरम्यान संसद परिसरात प्रवेश करणाऱ्यांनी कोरोना लशीचा कमीतकमी एक डोस घेतलेला असणे अनिवार्य असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: पंतप्रधान आता नवीन स्वामी झालेत का? त्यांच्याकडे गद्दारांसाठी वेळ पण GenZ साठी नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Mumbai Local: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, प्रवाशांचा खोळंबा होणार; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन

Kolhapur House fire in Rui : डोळ्यादेखत घरं जळून खाक, हातात काहीच उरलं नाही; पण गावाच्या एका आवाहनाने लाखोंची मदत उभी राहिली

Latest Marathi News Live Update : केशवराव भोसले नाट्यगृहासह अनेक विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Jharkhand Protest Reason : 38 प्रश्न सोडवले, तरी सरकारी नोकरी, झारखंडमधील स्कॅम काय?

SCROLL FOR NEXT