adhir ranjan chaudhary 
देश

चीन सीमेवरील स्थितीचा आढावा घेण्यासाठी संसदीय समिती लेहला

पीटीआय

नवी दिल्ली - चीन सीमेवर तैनात असलेल्या जवानांचा आणि स्थितीचा आढावा घेण्यासाठी संसदीय लोकलेखा समिती या महिनाअखेरीस लेहचा दौरा करणार आहे. कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन यांच्या नेतृत्वाखाली संसदीय लोकलेखा समितीचे शिष्टमंडळ २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी लेहचा दौरा करणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत-चीन सीमेवर तणाव कायम आहे. याशिवाय चीनच्या कुरापतीचा भारतीय जवानांना सातत्याने सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे भारत आणि चीन यांच्यात चर्चेची सातवी फेरी होऊनही समाधानकारक तोडगा निघालेला नाही. तेथील स्थिती जाणून घेण्यासाठी कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लेह दौऱ्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार बिर्ला यांनी खासदारांच्या दौऱ्याला परवानगी दिली आहे. या भेटीत जवानांची स्थिती, तयारी आणि गरजांचा आढावा घेतला जाणार आहे. खासदार लष्कराच्या उत्तर कमांडच्या अधिकाऱ्याबरोबरच संरक्षण मंत्रालयाच्या प्रतिनिधीशी देखील चर्चा करणार आहेत. शिष्टमंडळातील खासदार चीन सीमेवरील आघाडीच्या चौकीला भेट देऊन जवानांची विचारपूस देखील करु शकणार आहेत. दोन दिवसाच्या दौऱ्यात समितीचे सदस्य लेह येथील डीआरडीचोच्या कार्यालयासही भेट देतील. 

दुर्गम पर्वतरांगात तैनात असलेल्या भारतीय जवानांसंदर्भातील कॅगने दिलेल्या अहवालावर सध्या चर्चा होत आहे. कॅगने आपल्या अहवालात सियाचिन आणि लेह यासारख्या उंच ठिकाणावर तैनात असलेल्या जवानांकडे अत्याधुनिक उपकरणांची कमतरता असल्याचे म्हटले होते. त्यामुळे संसंदीय लोकलेखा समितीने  सरसेनाध्यक्ष बिपिन रावत आणि लष्कराच्या अन्य अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'विझलो जरी मी...', पोस्ट ठरली अखेरची, नगराध्यक्षपदाची निवडणूक लढलेल्या मनसे नेत्याचा अपघाती मृत्यू

Satara Fraud: 'साताऱ्यातील महिलेला २५ तोळे दागिन्यांना गंडा'; मैत्री नडली अन् चाैकशीत आलं धक्कादायक कारण समाेर..

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 12,000 शिष्यवृत्ती; वार्षिक उत्पन्न 3.50 लाख रुपये अन्‌ आठवीत पाहिजे ५५ टक्के गुण

मोठी बातमी! दारूचे दर वाढले अन्‌ विदेशी दारूचा खप झाला कमी; बनावट दारू व हातभट्टीची वाढली विक्री; दुकानदारांकडूनही हिशेबात चलाखी, वाचा...

Christmas Special: केळीपासून फक्त बनाना केकच नाही! ‘हे’ 5 ख्रिसमस रेसिपी ट्राय करा, सगळे विचारतील सीक्रेट

SCROLL FOR NEXT