Lok Sabha Election 2024 esakal
देश

Lok Sabha Election 2024 : सुरतमधील काँग्रेसचे लोकसभा उमेदवारावर पक्षाची कारवाई! सहा वर्षांसाठी केलं निलंबित

काँग्रेसने आणखी एका उमेदवारालाही अपक्ष म्हणून उभे केले होते

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद : यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील भाजपचा पहिला विजय नोंदल्या गेलेल्या सुरत मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांना पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. या निवडणुकीत कुंभानी यांचा अर्ज बाद ठरल्याने आणि त्यानंतर इतर उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने भाजपचे मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले होते.

भाजपच्या उमेदवाराचा विजय व्हावा, म्हणूनच कुंभानी यांनी हेतुपुरस्सर अर्जात त्रुटी ठेवल्याचा निष्कर्ष काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने काढला. कुंभानी यांच्या अर्जात प्रस्तावक म्हणून नाव असलेल्या व्यक्तींच्या सह्या बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयोगाने त्यांचा अर्ज बाद केला होता. काँग्रेसने आणखी एका उमेदवारालाही अपक्ष म्हणून उभे केले होते. त्यांचाही अर्ज बाद झाला होता. यामुळे काँग्रेसची नाचक्की झाली होती.

काँग्रेसने शिस्तपालन समिती स्थापन करत प्रकरणाची चौकशी केली आणि आज एक निवेदन प्रसिद्ध करत कुंभानी यांना सहा वर्षांसाठी निलंबित केल्याचे जाहीर केले. ‘कुंभानी यांचे कृत्य भाजपला मदत करणारे असल्यानेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कुंभानी यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. मात्र, बाजू मांडण्याऐवजी त्यांनी संपर्कच टाळला,’ अशी नाराजीही काँग्रेसने व्यक्त केली आहे. कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्यानंतर भाजपने इतर आठ उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावत सुरतच्या नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला, अशी टीकाही काँग्रेसने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT