देश

बिहारमध्ये पुतण्याला धक्का; काकाची पक्षाच्या नेतेपदी निवड

नामदेव कुंभार

बिहारच्या राजकारणात सोमवारी उलथापालथ झाली आहे. ज्येष्ठ रामविलास पासवान यांच्या पश्‍चात लोक जनशक्ती पक्षात (एलजेपी) फूट पडली आहे. पासवान यांच्या निधनानंतर पक्षाचे सर्वेसर्वा असलेले त्यांचे पुत्र चिराग पासवान यांच्याविरोधात पक्षातील खासदारांनी बंड पुकारले. या गटाचे नेतृत्व रामविलास पासवान यांचे कनिष्ठ बंधू पशुपती कुमार पारस यांच्या हाती सोपविण्यात आले आहे. लोक जनशक्ती पार्टीच्या पाच बंडखोर खासदारांची मागणी लोकसभा सभापतींनी स्वीकारली आहे. त्यामुळे चिराग पासवान यांचं लोकसभेतील संसदीय पक्षाचं नेतेपद गेलं आहे. पशूपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड झाली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचा आदेश जारी केला आहे.

रविवारी (ता.१३) रात्री एलजेपीच्या या नाट्याला सुरुवात झाली होती. सोमवारी रात्री अखेर चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून त्यांचे काका पशूपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली. या बंडामुळे बिहारच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड करताच पारस यांनी ‘मी पक्ष फोडलेला नाही, तर वाचवला आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पारस हे हाजीपूरचे खासदार आहेत. या बंडानंतर त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रशंसा केली. ‘‘नितीश कुमार हे एक चांगले नेते आणि ‘विकास पुरुष’ आहेत’’, असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी ‘एलपीजे’त पडलेल्या फुटीमुळे अनेक बदल होणार असून हा पक्ष मंत्रिमंडळात सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चिराग पासवान यांच्या वर्तणुकीमुळे पक्षाचे खासदार व नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराजी होती. पशुपती पारस यांनी संयुक्त जनता दलाने (जेडीयू) पक्षाला साथ द्यावी, असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वीही झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT