Train Accident in Andhra Pradesh 
देश

Train Accident in Andhra Pradesh: विजयनगरममध्ये भीषण रेल्वे अपघात, दोन पॅसेंजर ट्रेनमध्ये धडक; एकाचा मृत्यू, १० जखमी

Sandip Kapde

Train Accident in Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील विजयनगरम (Vizianagaram) जिल्ह्यातील अलमांडा-कंकटापल्लीजवळ रविवारी एका पॅसेंजर ट्रेनची दुसर्‍या पॅसेंजर ट्रेनला धडक बसल्याने एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले . ही ट्रेन विशाखापट्टणमहून रायगडाकडे जात असताना तीन डबे रुळावरून घसरले. 

या अपघातात १० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरु आहे.

मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी तात्काळ मदत उपाययोजना करण्याचे आणि विझियानगरमच्या जवळचे जिल्हे विशाखापट्टणम आणि अनकापल्ली येथून शक्य तितक्या रुग्णवाहिका पाठवण्याचे आदेश दिले आणि चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्र्यांनी आरोग्य, पोलिस आणि महसूल यासह इतर सरकारी विभागांना त्वरीत मदत उपाययोजना करण्यासाठी आणि जखमींना त्वरित वैद्यकीय सेवा मिळतील याची खात्री करण्यासाठी समन्वय साधण्याचे आदेश जारी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT