Passenger vehicle sales 
देश

प्रवासी वाहनांच्या विक्रीत 45 टक्क्यांनी वाढ

कार्तिक पुजारी

प्रवासी वाहनांच्या विक्रीत जुलै महिन्यात 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2021 च्या जुलैमध्ये 2,64,442 युनिटची विक्री झाली आहे

Passenger vehicle sales नवी दिल्ली- प्रवासी वाहनांच्या विक्रीत जुलै महिन्यात 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2021 च्या जुलैमध्ये 2,64,442 युनिटची विक्री झाली आहे, ही संख्या मागील वर्षी याच महिन्यात 1,82,779 इतकी होती. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने Society of Indian Automobile Manufacturers (SIAM) गुरुवारी यासंदर्भातील माहिती जाहीर केलं आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (National Latest News)

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या माहितीनुसार, टू-व्हीलरची OEMकडून डिलरकडे झालेल्या डिस्पॅचमध्ये दोन टक्क्याची घट झालीये. जुलै महिन्यात 12,53,937 युनिट टू-व्हीलर डिलरला देण्यात आले होते. मागील वर्षी याच महिन्यात 12,81,354 युनिट टू-व्हीलर डिस्पॅच झाले होते. मोटार सायकल विक्री मागील महिन्यात 8,37,096 युनिटची झाली. मागील वर्षी जुलै महिन्यात 8,88,520 युनिटची विक्री झाली होती. स्कूटरच्या विक्रीत दहा टक्क्यांनी वाढ झालीये. 3,66,292 युनिट विकले गेले आहेत.

थ्री-व्हीलरच्या विक्रीत 41 टक्क्यांनी वाढ झालीये. जुलै महिन्यात 17,888 युनिटची विक्री झाली आहे, मागील वर्षी याच महिन्यात 12,728 युनिटची विक्री झाली होती. व्यावसायिक वाहने वगळता 15,36,269 युनिटची विक्री झाली आहे. मागील वर्षी याच महिन्यात 14,76,861 युनिटची विक्री झाली होती.

जुलै महिन्यातील डेटावर बोलताना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स डायरेक्ट जनरल राजेश मेनन म्हणाले की, भारतीय ऑटोमोबाईल सेक्टर अनेक अडचणींमधून जात आहे. जगभरात सेमी-कंडक्टरचा तुटवडा आहे. तसेत सुट्या पार्ट्सच्या किंमतीत वाढ झाली आहे. लोकांची सुरक्षा लक्षात घेत इंडस्ट्री चेन सप्लाय सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच कंपनीकडून संभाव्या तिसऱ्या लाटेबाबतची काळजी घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT