Ramdev 
देश

Patanjali MBBS: NEET परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पतंजलीची मोठी घोषणा; रामदेव यांनी सांगितला प्लॅन

NEET परीक्षेत आणि त्याच्या निकालात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे सहसंस्थापक बाबा रामदेव यांनी पतंजलीच्यावतीनं एक मोठी घोषणा केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Patanjali MBBS College : NEET परीक्षेत आणि त्याच्या निकालात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे सहसंस्थापक बाबा रामदेव यांनी पतंजलीच्यावतीनं एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, पतंजली देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठं एमबीबीएसचं कॉलेज सुरु करणार आहे. त्याचबरोबर कंपनीचे इतरही अनेक कॉलेजेस सुरु करण्याचा प्लॅन असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदेव यांनी ही माहिती दिली. (Patanjali to launch world largest MBBS medical college Baba Ramdev told plan)

रामदेव यांनी सांगितलं की, खासगी वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील भरमसाठ फीमुळं विद्यार्थ्यांचा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांकडं जास्त ओढा आहे. ही बाब लक्षात घेता येत्या १ ते २ वर्षात पतंजली वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या तयारीत असून पतंजलीचं सर्वात मोठं एमबीबीएस कॉलेज आणि जगातील सर्वात मोठं शैक्षणिक विद्यापीठ भारतात सुरु करण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे.

बड्या उद्योगांकडं सीएसआरचा निधी मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळं परवडणाऱ्या दरात मेडिकल कॉलेजेस सुरु करण्याबाबत पतंजली आयुर्वेदची काय भूमिका आहे? या प्रश्नावर बोलताना रामदेव म्हणाले, "सध्या आम्ही बीएमएस, आयुर्वेद, बीएनवाय यामध्ये लोकांना डॉक्टरेट देत आहोत. पण आता पुढे पतंजली एमबीबीएस, एमडी आणि सर्जरीचे अॅडव्हान्स कोर्सेस साधारण एक ते दोन वर्षात सुरु करणार आहे.

यामध्ये आधी देशातील आणि नंतर जगातील सर्वात मोठं शैक्षणिक विद्यापीठ तयार करायचं आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम यांच्यासह शिक्षणाचे सर्व प्रवाह भारतातून वाहावेत अशी माझी इच्छा आहे. तसंच एमबीबीएस कॉलेजमधून एका शेतकऱ्याचा आणि मजुराचा मुलगाही शिकून डॉक्टर बनू शकेल.

तसंच तो चांगला डॉक्टर बनून लोकांची सेवा करु शकेल, हे लक्ष्य ठेवून आम्ही पुढे जात आहोत. लवकरच तुम्हाला पतंजलीचं या वर्षी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल पहायला मिळेल. यामध्ये आम्ही सर्व प्रकारच्या सर्जरी माफक दरात उपलब्ध करुन देणार आहोत. त्यानंतर तुम्हाला पतंजलीचं एमबीबीएस कॉलेजही पहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT