Corona-Patient 
देश

महत्वाची बातमी; देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या साथीमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे २७.५२ टक्क्यांवर पोहोचले आहे, असा दावा केंद्र सरकारने आज केला. मात्र देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत २४ तासांत २५५३ रुग्णांची वाढ होऊन हा एकूण आकडा ४२८३६ वर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात सक्रिय कोरोनाग्रस्त २९,६८५ आहेत. कोरोनाबळींचा आकडाही वाढत चालला असून तो १३८९ वर पोचला आहे. चोवीस तासांमध्ये ६९२ लोक बरे झाले असून आतापर्यंत कोरोनाच्या वेढ्यातून मुक्त झालेल्यांची संख्या ११७६२ पर्यंत वाढली आहे. कोरोनाबाबत घबराट पसरू नये, यादृष्टीने जास्तीत जास्त सकारात्मक आकडेवारी समोर आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असतानाच नव्या रुग्णसंख्येबरोबरच मृतांच्या आकड्यांमध्ये मात्र दर दिवशी वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ८३ झाली असून आतापर्यंत एका दिवसात मृत्युमुखी पडलेल्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. या लढाईमधील सर्वात संवेदनशील टप्प्याला आजपासून सुरुवात झाली असून देशभरात पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder: केतन हत्याकांडानंतरही सियाचा निर्ढावलेपणा कायम; लॉकअपमध्ये केली अशी मागणी की पोलिसही चकित

IND vs IRE 1st T20I: कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची टीम सोबत पहिली मिटींग, वैभव सूर्यवंशीचं कसं झालं स्वागत? पाहा Video

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगी घोटाळ्याप्रकरणी जी एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे ती केवळ धूळफेक-अरविंद केजरीवाल

Maharashtra Weather: राज्यात पावसाचा जोर वाढणार! मुंबईसह २३ जिल्ह्यांना अलर्ट, हवामान विभागाचा नवा अंदाज

Satara Crime: कऱ्हाडातील गांजाचे आंतरजिल्हा रॅकेट; सोलापूरच्या मंगळवेढ्यापर्यंत साखळी, आणखी तिघांना अटक

SCROLL FOR NEXT