Terrorist esakal
देश

2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा कट; 2 दहशतवाद्यांना अटक

भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा मोठा खेळ बिहारमध्ये सुरू होता.

सकाळ डिजिटल टीम

भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा मोठा खेळ बिहारमध्ये सुरू होता.

पाटणा : 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र (Islamic Nation) बनवण्याच्या मोहिमेसाठी केरळ आणि इतर अनेक राज्यांतील तरुणांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाचा पर्दाफाश करून सुरक्षा दलांनी फुलवारीशरीफ, बिहारची राजधानी पाटणा (Bihar Patna) इथून दोन आरोपींना अटक केलीय. त्यांचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पाटणा दौऱ्याच्या एक दिवस आधी सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आलीय.

मार्शल आर्ट्स आणि फिजिकल ट्रेनिंग देण्याच्या नावाखाली पाटण्यात एक अतिशय धोकादायक खेळ सुरू होता. पाकिस्तान, बांगलादेशसह इतर देशांशीही त्याचे संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत. सुरक्षा यंत्रणांना या लोकांची माहिती होती. आयबी, दिल्लीकडून माहिती मिळाल्यानंतर एएसपी मनीष यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा छापे टाकले. शरीफ नया टोला येथील एसडीआयपी (सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) आणि पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) यांच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. कारवाईदरम्यान जलालुद्दीन खान आणि अतहर परवेझ या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी आता अटकेला दुजोरा दिलाय. पोलिसांनी सांगितलं की, जलालुद्दीन हा झारखंडमध्ये इन्स्पेक्टर होता आणि तो निवृत्त झाला आहे.

संघटनेच्या नावाखाली शस्त्र प्रशिक्षण

अतहर जुन्या सदस्यांना एकत्र करून SDFI नावाची संघटना स्थापन करण्याच्या नावाखाली गुप्तपणे प्रशिक्षण देत होता. यामध्ये शस्त्र वापरण्यापासून ते देशात उन्माद निर्माण करण्यापर्यंतची रणनीती सांगण्यात आली. हे लोक व्हिजन 2047 वर काम करत होते, ज्यात भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या मिशनचा एक भाग म्हणून देशात जातीय तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केलं होतं. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पुस्तिका, कागदपत्रं आदींवरून याचा पुरावा मिळालाय.

चौकशी केल्यानंतर एनआयए आणि एटीएस या दोन्ही अधिकाऱ्यांना आयबीकडून याची माहिती मिळाली. फुलवारीशरीफ येथील कार्यालयात केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडूसह अनेक राज्यातील तरुण प्रशिक्षणासाठी येत असल्याचंही तपासात निष्पन्न झालं.

एनजीओच्या नावावर घेतलं होतं घर

अतहरनं फुलवारी शरीफमध्ये सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे कार्यालय उघडले होते. एनजीओच्या नावानं त्यानं भाड्यानं घर घेतलं होतं. सुमारे दोन महिने हे कार्यालय सुरू होतं, पण बाहेरून काहीच कळत नव्हतं. यात जलालुद्दीनच्या भूमिकेवर शंका घेतली जात आहे. अतहर नावाचा व्यक्ती नया टोला इथं संघटना स्थापन करून देशविरोधी कारवाया करत असल्याची माहिती आयबीला मिळाली होती.

अतिशय धोकादायक प्लॉट

एएसपी मनीष कुमार यांनी सांगितलं की, अतहर परवेझ एसडीएफआय नावाची संघटना स्थापन करण्याच्या नावाखाली सिमीच्या जुन्या सदस्यांना एकत्र करून प्रशिक्षण देत असे. छाप्यादरम्यान त्याच्या कार्यालयातून व्हिजन 2047 पुस्तिका, पीएफआय ध्वज, पॅम्प्लेटसह अनेक खळबळजनक कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.

अनेक भक्कम पुरावे मिळाले

या लोकांविरुद्ध अशी अनेक माहिती मिळाली आहे, ज्यावरून देशाला कमकुवत करण्यात आणि शांतता व्यवस्थेला खीळ घालण्यात त्यांचा हात असल्याचं दिसून येतं. त्यांना परदेशातून निधीही मिळत होता. अतहर परवेझ आणि जलाउद्दीन खान यांच्या मालमत्ता कुठून आल्या याचाही तपास सुरू आहे. दोघांनाही तुरुंगात पाठवण्यात आलंय. त्यांना रिमांडवर घेण्याची कारवाई सुरक्षा यंत्रणा करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT