Child Custody esakal
देश

Patna High Court : मुलांचा ताबा देण्याचे आदेश बदलता येऊ शकतात; हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

संविधानातल्या कलमाचा उद्देश अल्पवयीन मुलांच्या कल्याणासाठी न्याय्य व योग्य तरतूद करणे हा आहे, असं म्हटलं आहे.

वैष्णवी कारंजकर

मुलांचा ताबा देणं हा अंतिम आदेश किंवा बदलता न येणारा निर्णय नाही. हा निर्णय मुलांच्या गरजेप्रमाणे बदलता येऊ शकतो, असं पटना उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

“हिंदू विवाह कायदा, १९५६ च्या कलम २६ अन्वये, न्यायालयाला कार्यवाही प्रलंबित असताना किंवा कायद्यांतर्गत कोणताही हुकूम पारित झाल्यानंतर मुलांचा ताबा, पालनपोषण आणि शिक्षण यासंदर्भात कोणताही आदेश देण्याचा किंवा कोणतीही व्यवस्था करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. . या कलमांतर्गत दिलेले आदेश वेळोवेळी निरनिराळे, निलंबित किंवा रद्द केले जाऊ शकतात. या कलमाचा उद्देश अल्पवयीन मुलांच्या कल्याणासाठी न्याय्य आणि योग्य तरतूद करणे हा आहे,” असं त्यात म्हटलं आहे.

एका घटस्फोटाच्या खटल्यामध्ये फॅमिली कोर्टाच्या न्यायाधीशांनी दिलेला आदेश राखून ठेवल्याच्या याचिकेवर सुनावणी झाली, त्याबद्दल हे निरीक्षण नोंदवण्यात आलं. कोर्टाने याचिकाकर्ता पतीला आपल्या मुलाची कस्टडी पत्नीकडे सोपवण्याचे आदेश दिले. या दोघांचं लग्न २०१० मध्ये झालं होतं. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने २०१५ मध्ये घटस्फोट घेतला.

पतीने पत्नीला पोटगी म्हणून ५ लाख रुपये द्यायचे आणि मुलीची कस्टडी पतीकडे राहील असं ठरलं होतं. त्याप्रमाणे पतीने २०१६मध्ये पैसे दिले आणि अल्पवयीन मुलीचा ताबा पतीकडे गेला. पण घटस्फोटानंतर मुलीची कस्टडी मागण्यासाठी पत्नीने नंतर याचिका दाखल केली. पतीने याला विरोध केला आणि दिलेले पैसेही परत मागितले. पत्नी आणि तिच्या घरचे आपल्याला त्रास देत असल्याचा त्याने आरोपही केला.

त्यानंतर फॅमिली कोर्टाने पत्नीला पतीचे पैसे परत देण्याचे आदेश दिले असून पतीला मुलीची कस्टडी तिच्या आईकडे सोपवण्यास सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT