india-china 
देश

सीमेवर शांतता प्रस्थापित करा; भारताने चीनला सुनावले

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - सीमाभागातील शांतता आणि सलोखा हाच भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंधांचा आधार असल्याने तणाव कमी करणारी जबाबदार कृती चीनकडून अपेक्षित आहे, अशा इशारेवजा आवाहनातून भारताने चीनला सुनावले आहे. पॅंगाॅग सरोवर परिसरातील फिंगर क्षेत्रातून माघार घेण्याबाबत चीनच्या आडमुठ्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या कृतीगटाच्या (डब्ल्यूएमसीसी) बैठकीआधी भारताने हा इशारा दिला आहे. 

भारत आणि चीनदरम्यान लवकरच ‘डब्ल्यूएमसीसी’ची बैठक होईल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी आज सांगितले. ताबारेषेवरील यथास्थितीमध्ये एकतर्फी बदलाचा कोणताही प्रयत्न मान्य केला जाणार नाही, ही भारताची भूमिका स्पष्ट करताना अनुराग श्रीवास्तव यांनी चीनला दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींच्या चर्चेमधील सैन्य माघारीच्या सहमतीचीही आठवण करून दिली. 

साप्ताहिक वार्तालापादरम्यान श्रीवास्तव यांनी सांगितले, की ताबारेषेला उभयमान्यता हा सीमाभागातील शांतता आणि सामंजस्याचा आधार आहे. १९९३ पासून भारत आणि चीनमध्ये झालेले अनेक करारही यावरच आधारीत आहेत. असे असताना चिनी सैन्याने या करारांना हरताळ फासताना भारतीय भूभागावर बिनबुडाचा आणि अवास्तव दावा सांगितला असून मोठ्या प्रमाणात सैन्य तुकड्या तैनात केल्या आहेत. ताबारेषेच्या आदरासाठी भारत कटिबद्ध आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पूर्ण सैन्य माघारीचे उद्दिष्ट 
ताबारेषेवरून दोन्ही बाजूंच्या सैन्य तुकड्यांनी पूर्णपणे माघार घेणे आणि भारत चीन सीमेवर शांतता व सलोखा प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमध्ये आधीच सहमती झाली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राजनैतिक तसेच लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर दोन्ही देशांची बोलणीही सुरू आहेत. वरिष्ठ कमांडर पातळीवरील चौथ्या टप्प्यातील चर्चा १४ जुलैला झाली होती. त्या पार्श्वभूमीवर सीमावादावरील उभय देशांच्या कृती गटाची (डब्ल्यूएमसीसी) बैठक लवकरच होईल, असेही अनुराग श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT