penguin Team eSakal
देश

गुजरात सरकारने आणले पेंग्विन; आता bjp काय बोलणार? - महापौर पेडणेकर

पेंग्विनमुळे पुन्हा वाद पेटणार?

सुधीर काकडे

महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिकेने (BMC) आणलेले पेंग्विन (Penguin) हा मोठा चर्चेचा विषय ठरला होता. पेंग्विनला लागणाऱ्या खर्चावरून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. विषेशत: आदित्य ठाकरे यांना तेव्हा याचा मोठा विरोध सहन करावा लागला होता. त्यातच आता पुन्हा एकदा पेंग्विन चर्चेत आले आहेत. कारण आता गुजरात (Gujrat) सरकारने देखील पेंग्विन आणले आहेत.

गुजरात सरकारने नुकतेच आफ्रिकन पेंग्विन विकत घेतले आहेत. हे पेंग्विन गुजरातमधील सायन्स सिटीत एक पेंग्विन कक्ष उभारून त्यात ठेवण्यात आले आहेत. या कक्षाचं उद्घाटन गुजरात सरकारच्या शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे गुजरात सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या पेंग्विन डॉक्टरांना गुजरात प्रकल्पात मदत करण्यास विनंती केलीय. त्यामुळे आता शिवसेना चांगलीच आक्रमक झालीय. आता मुंबई भाजपचे नेते यावर काय प्रतिक्रिया देणार, हे त्यांना मान्य आहे का ?असा प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) यांनी केलाय. गुजरातच्या या पेंग्विनवरून भाजपला येणाऱ्या काळात टीकेचा सामना करावा लागू शकतो असं दिसून येतंय.

दरम्यान, गुजरातमधील हे पेंग्विन चेंबर मुंबईपेक्षा लहान असून, त्यांचा दैनंदिन खर्च 2.5 लाखांहून अधिक आहे. मुंबईच्या पेंग्विनला सांभाळण्यासाठी वर्षभरात तब्बल १२ कोटींचा खर्च येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT