narendra modi sakal media
देश

जम्मूला बगल देता येणार नाही : अमित शहा

राज्यातील गुंतवणूक वाढविण्याचे आश्‍वासन

सकाळ वृत्तसेवा

जम्मू : जम्मूतील लोकांना बाजूला करण्याचा काळ आता संपला असून काश्‍मीर आणि जम्मू या दोन्हींचा एकत्रित विकास करण्यात येईल असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे सभेत बोलताना केले. सध्या तीन दिवसांच्या काश्‍मीर दौऱ्यावर आलेल्या शहांनी भगवती नगर परिसरात जाहीर सभा घेतली. राज्याच्या विकासामध्ये कोणीही अडथळा आणू शकत नाही असा विश्‍वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

शहा म्हणाले की, या केंद्रशासित प्रदेशामध्ये आधीच बारा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून पुढील वर्षीपर्यंत हे प्रमाण ५१ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. राज्यातील तरुण विकासात सहभागी झाले तर दहशतवाद्यांना त्यांच्या कारवायांमध्ये फारसे यश येणार नाही. हिंसाचारामध्ये येथील एकाही तरुणाचा बळी जाता कामा नये म्हणून सरकारचे प्रयत्न सुरू असून राज्यातून दहशतवादाचा खातमा झाला आहे.

विकासकामांचा प्रारंभ

शहा यांनी या जाहीर कार्यक्रमापूर्वी जम्मूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) नव्या कॅम्पसचेही उद्‌घाटन केले तसेच विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी देखील त्यांच्या हस्ते झाली. यावेळी नायब राज्यपाल मनोज सिन्हा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री जितेंद्रसिंह देखील उपस्थित होते.

शहा म्हणाले

  • राज्याचा विकास कुणीही रोखू शकत नाही

  • आतापर्यंत तीन कुटुंबांनी राज्याला लुटले

  • आम्ही तिघांची दादागिरी संपुष्टात आणली

  • जम्मू- काश्‍मीर ही पवित्र मंदिरांची भूमी

  • मोदींमुळे प्रत्येक गावात पंचायतीची स्थापना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT