Chandrayaan 3 
देश

Chandrayaan 3 : चांद्रयान-3 च्या लँडिंग सोहळ्यासाठी देशभरात उत्साह; इस्लामिक सेंटरमध्ये मुलांचं नमाज पठण

भारताची महत्वाकांक्षी अंतराळ मोहिम असलेल्या चांद्रयान ३ चं उद्या प्रत्यक्ष चंद्रावर लँडिंग होणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Lucknow News: भारताची महत्वाकांक्षी अंतराळ मोहिम असलेल्या चांद्रयान ३ चं उद्या प्रत्यक्ष चंद्रावर लँडिंग होणार आहे. याची देशभरात मोठी चर्चा असून या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना केल्या जात आहेत. हिंदू मंदिरांमध्ये अनेकांनी यासाठी होमहवन केले होते आता उत्तर प्रदेशातील लखनऊच्या इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया इथं मुलांनी नमाज पठण केलं. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

चांद्रयानाच्या यशस्वितेसाठी करण्यात आलेल्या या नमाज पठणाबाबत बोलताना लखनऊ ईदगाहचे इमाम खालीद रशीद फिरंगी महाली यांनी सांगितलं की, इस्लामिक सेंटर मदरशात मुलांनी नमाज पठण केलं तसेच चांद्रयानाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी प्रार्थना केली. (Latest Marathi News)

या मुलांना इथं विज्ञानही शिकवलं जात त्यामुळं एकूणच भारताच्या या मोहिमेबाबत या मुलांमध्ये उत्सुकताही आहे. या मोहिमेसाठी मेहनत घेतलेल्या इस्त्रोच्या सर्व वैज्ञानिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आत्तापर्यंत कोणीही न पोहोचू शकलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जर उद्या चांद्रयानाचं लँडिंग यशस्वी झालं तर भारत ही कामगिरी करणारा पहिला देश ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT