Petrol Pump
Petrol Pump esakal
देश

Petrol Pump वर 0.00 चेक करण्याच्या नादात या स्कॅमकडे कोणाचंच लक्ष नसतं, तुम्हीही हीच चूक करता काय?

साक्षी राऊत

Scam On Petrol Pump : तुम्ही प्रवासासाठी कार किंवा बाइकचा वापर करत असल्यास पेट्रोल पंपावर रोज जातच असाल. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोलच्या बाबतीत होणारा घोळ बघून बहुतेक जण सावध झाले आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपावर जाताबरोबरत आधी आपलं लक्ष पेट्रोलच्या मीटरवर ०.०० लिहीले आहे का यावरच असते.

मात्र त्यामुळे तुमचे आणखी एका स्कॅमकडे संपूर्ण दूर्लक्ष होते. पेट्रोल पंपावर फक्त मीटरवरील ०.०० वरच नाही तर आणखी एका ठिकाणी तुमची बारीक लक्ष असणं गरजेचं आहे. आज आपण या स्कॅमबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

नजर हटताच खिसा होईल खाली

पेट्रोल भरताना जेव्हा तुमचं लक्ष पेट्रोलच्या मीटरवर ०.०० चेक करण्याकडे असते तेवढ्या वेळात पेट्रोलची डेंसिटी दर्शवणाऱ्या सेक्शनमध्ये मोठा घोळ होत असतो. तुम्ही पेट्रोल पंपावर जाताच पेट्रोल भरणाचे कर्मचारी तुम्हाला मीटरवर लक्ष देण्यास सांगतात मात्र डेंसिटीवर लक्ष देण्यास अजिबात सांगत नाहीत.

फ्यूलच्या शुद्धतेचं प्रमाण डेंसिटीवरून कळतं

माहितीसाठी पेट्रोल पंप मशीनमध्ये असलेल्या डेंसिटी दर्शवणारे मीटर पेट्रोल, डिझेलच्या शुद्धतेशी संबंधित असते. इथे सेट केलेला आकडा हा शासनाने ठरवल्याप्रमाणे असावा. डेंसिटीच्या माध्यमातून तुमच्या कार किंवा बाइकमध्ये टाकले जाणारे पेट्रोल पूर्णपणे शुद्ध आहे की नाही हे चेक केले जाते. यावर तुमचे लक्ष नसल्यास तुमच्या मोबाइलमध्ये भेसळयुक्त पेट्रोल डिझेल टाकले जाऊ शकते. यामुळे तुमच्या गाडीचे इंजिनही बिघडू शकते.

अशा प्रकारे तुमची फसवणूक होऊ शकते

डेंसिटी निश्चित केलेल्या मानकांशी छेडछाड करून अनेक पेट्रोल पंपांवर ग्राहकांची फसवणूक केली जाते. पेट्रोल डिझेलच्या डेंसिटीवरून त्याचा दर्जा ठरतो. त्यात थोडीफार तफावत झाल्यास त्यात भेसळ असल्याचे समजते.

पेट्रोलची डेंसिटी 730 ते 800 किलो प्रति घनमीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे. दुसरीकडे, जर आपण डिझेलबद्दल बोललो, तर त्यासाठी डेंसिटी(डिझेल घनता) 830 ते 900 किलो प्रति घनमीटर निश्चित केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT